1. बातम्या

येत्या आठवड्यात महागाईचे वादळ धडकण्याची शक्यता! पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत होऊ शकते इतकी वाढ

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पडत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे गगनाला पोहोचले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
can be petrol disel price hike

can be petrol disel price hike

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. या युद्धाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर पडत आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे गगनाला पोहोचले आहेत. 

परंतु गेल्या चार महिन्यांपासून भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल मध्ये दरवाढ झालेले नाही. परंतु आता ही परिस्थिती  संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. जर मध्यंतरी कालावधीचा विचार केला तर पेट्रोलचे भाव जवळ शंभर रुपयाच्या वरती गेली तेव्हा देशभर संतापाचे वातावरण तयार झाले होते.त्यानंतर केंद्र सरकारने भाजपशासित राज्यांमध्ये उत्पादन शुल्क कमी केले होते त्यामुळे या राज्यात पेट्रोलच्या किमती शंभरच्या आत-बाहेर आहेत. त्यासोबत उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये निवडणुकीचा कालावधी असताना  जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये त्यासोबत जनतेच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी चार महिन्यांपासून इंधन दरवाढ सरकारने थोपवून धरली होती. परंतु आता उद्या या निवडणुकांचा निकाल लागणार आहे.

त्यामुळे या निकालानंतर काय होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे. या क्षेत्रातील तज्ञ आणि विश्लेषक यांच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लिटरमागे पंधरा रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. जर 2017 या वर्षाचा विचार केला तर तेव्हापासून खनिज तेलाच्या किमतींचा आंतरराष्ट्रीय बाजार भावानुसार ताळमेळ  घालण्यात येतो. मागच्या वर्षी 4 नोव्हेंबर 2021पासून किमती स्थिर आहेत. लोकांचा रोष कमी  होण्यासाठी आणि निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का पोहोचू नये यासाठी सरकारने ही तारेवरची कसरत केली होती. पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण सेल च्या माहितीनुसार भारताने खरेदी केलेल्या तेलाच्या काफील्यातएक मार्च रोजी 111 डॉलर प्रती बॅरल ची वाढ झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारने केलेला आटोकाट प्रयत्न यापुढे टिकाव धरणार नाही हे स्पष्ट आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे भारत हा इंधनासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. जर देशातील एकूण इंधन मागणीचा विचार केला तर 85% मागणीही पूर्ण करण्यासाठी विदेशातून पुरवठा होतो. 

त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावात वाढ झाली तर सरकार जास्त वेळ या भाववाढीचा भार सहन करू शकत नाही. तसेच रुपयाची घसरण हा देखील एक चिंतेचा विषय असून या दोन्ही गोष्टींचा फटका देखील अर्थव्यवस्थेला बसण्याची दाट शक्यता आहे. सध्या खनिज तेलाचे भाव 130 डॉलर प्रती बॅरल इतके झाले आहेत. जर या भावाचा विचार केला तर जुलै 2008 मध्ये खनिज तेल या किमतीवर  होते. त्यानंतर तेरा वर्षांनी खनिज तेलाच्या किमती मध्ये एवढी उच्चतम वाढ झाली आहे

English Summary: in will be next week petrol and disel price hike due to russia ukrein war Published on: 09 March 2022, 11:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters