1. बातम्या

Market Anylysis: येणाऱ्या काळात तांदूळ उत्पादक शेतकरी मालामाल होण्याची दाट शक्यता,वाचा कारणे

भात हे भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांचे एक प्रमुख खाद्यान्न आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतले जाते व आहारात देखील मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. परंतु एवढे महत्त्वाचे असलेले पिकावर विविध गोष्टींचा विपरीत परिणाम झाल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा भारताच्या उत्पादनावर होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
paddy crop

paddy crop

भात हे भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांचे एक प्रमुख खाद्यान्न आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर आशिया खंडामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतले जाते  व आहारात देखील मोठ्या प्रमाणात समावेश केला जातो. परंतु एवढे महत्त्वाचे असलेले पिकावर विविध गोष्टींचा विपरीत परिणाम झाल्यामुळे  त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा भारताच्या उत्पादनावर होत आहे.

भारत हा जगभरात सर्वाधिक तांदूळ निर्यात करणारा देश आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर त्यानुरूप  येणाऱ्या काळात तांदुळाच्या किमतीत प्रचंड वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

नक्की वाचा:केंद्रीय पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी; शेतकऱ्याने अधिकाऱ्यांशी साधला फडाफड इंग्रजी मध्ये संवाद

तांदळाच्या किमतीत वाढ होऊ शकते,या मागील कारणे

 रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये जो काही तणाव आहे त्यामुळे जगभरात गव्हाच्या उत्पादनात घट आली व जगात गव्हाच्या किमतीमध्ये वाढ झाली.

सहाजिकच  गहू महाग झाल्यामुळे त्या पासून बनणारे पदार्थ उदाहरणच घ्यायचे झाले तर गव्हाच्या पिठाच्या दरात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना महागाईचा फटका बसला. त्यातच भर म्हणून कि काय देशामध्ये तांदळाचे उत्पादन घटल्यामुळे त्याचा फटका जगभरातील लोकांना बसण्याची शक्यता आहे.

प्रमुख तांदूळ उत्पादक राज्य जसे की पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये  पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे भात पेरणी क्षेत्रात तब्बल 13 टक्के घट झाली आहे.

नक्की वाचा:ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकार ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याच्या तयारीत

या उत्पादन घटीमुळे केंद्र सरकारकडून गहू आणि साखर आणि तांदळाच्या निर्यातीवर देखील बंधने लादली जाऊ शकतात. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याचा परिणाम आता जाणवू लागल्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिसा आणि छत्तीसगड राज्यात देखील  दहा टक्क्यांची भाववाढ नोंदविण्यात आली.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये भारतात पाऊस कसा पडतो या सर्व परिस्थितीवर आता तांदळाचे उत्पादन अवलंबून आहे. जर तांदळाच्या उत्पादनात घट आली तर त्याचा मोठा फटका देशातील नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:उद्या होणार सोक्षमोक्ष! शिवसेना कुणाची; सर्वोच्च न्यायालयात उद्या पुन्हा सुनावणी होणार

English Summary: in will be coming few days rice price can be growth Published on: 04 August 2022, 11:32 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters