
in will be coming few days petrol and disel price can be decrese
येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये घसरण होऊन सर्व सामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा सध्या निर्माण झाली आहे. त्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे कारण असून जगातील अर्थव्यवस्था कडून कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि ब्रँट क्रूड पुन्हा एकदा प्रति बॅरल $100 च्या खाली पोहचले असून कच्च्या तेलाच्या किमतीत सोमवारी फार मोठी घसरण झाली.
जर आपण अमेरिका किंवा चीनची काही दिवसांपूर्वीची आकडेवारी बघितली तर जगभरातील प्रमुख देश मागणीत कमकुवत स्थितीचा सामना करत असून त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होत आहे. त्यातल्या त्यात या आठवड्यात ओपेक देशांची जी काही बैठक होत आहे, त्या बैठकीकडे गुंतवणूकदारांच्या नजरा लागल्या असून या बैठकीमध्ये पुरवठा कसा वाढेल यावर चर्चा होणार आहे.
कच्च्या तेलाचे सोमवारचे दर
जर सोमवारचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा विचार केला तर ब्रँट क्रूड फ्युचर्स प्रती बॅरल $100च्या जवळपास बंद झाले.म्हणजेच प्रती बॅरल $3.94 टक्क्यांनी ते घसरले.
तसेच व्यापारादरम्यान किमती प्रती बॅरल $99.09 च्या पातळीवर पोहोचल्या. त्याच वेळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रती बॅरल $ 4.73 ने घसरून प्रती बॅरल $ 93.89 वर पोहोचल्या. जर याबाबतीत रॉयटर्सच्या मताचा आधार घेतला तर या पातळीच्या खाली गेल्यास क्रूड मध्ये आणखी घसरण होऊ शकते.
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वर काय होईल परिणाम?
भारतातील जे काही तेल कंपन्या आहेत त्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून तोटा सहन करावा लागत आहे.किमती खाली आल्यास त्यांचे नुकसान भरून काढले जाईल त्यामुळे आणखी किंमतीत कपात होऊ शकते. आपल्याला माहित आहेच की गेल्या दोन महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर अधिक काळ स्थिर आहेत.
Share your comments