यावर्षी पावसाने तर आपले आगमन थोडे लवकरच केले तसेच यावेळी सतत तर नाही पण अधून मधून जोरदार पाऊस होत होता त्यामुळे सोयाबीन पिकाची परिस्थिती जर पाहिले गेले तर ती एवढी पण बिकट नाही जे की त्या तुलनेत चांगली च आहे.परंतु वाशीम जिल्ह्यातील वारसा महसूल मंडळ मधील काही अशी गावे आहेत जसे की वाई, वारला, शिरपुटी आणि कृष्णा अशा गावसारखी १८ गावामध्ये पाऊस च पडला नसल्यामुळे तेथील शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे.
उत्पादन पावसाच्या अभावामुळे घटले:
वाशीम मधील या गावांमध्ये पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे जवळपास ९० टक्के उत्पादन घटल्याचे चित्र समोर आलेले आहे आणि याचा संताप तेथील शेतकरी वर्गाला होत आहे, शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे.जवळपास तिथे २० दिवस कसलाच पाऊस झाला नसल्यामुळे फुलांच्या अवस्था मध्ये असणाऱ्या सोयाबीन पिकाला शेंगाचा लागल्या नाहीत आणि त्यामुळे सोयाबीन या पिकाला लागवडी साठी जो खर्च गेला आहे तो खर्च सुद्धा माघारी भेटणार नाही.कारण पावसा अभावी सोयाबीन चे ९० टक्के नुकसान झालेले आहे त्यामुळे तेथिल शेतकऱ्यांना लागवडी साठी गेलेला पैसा जर वसूल झाला तरी वाईट वाटणार नाही आणि या चिंतेत च शेतकरी गुरफटून बसलेला आहे.वाशीम जिल्ह्यामध्ये सुरुवातीस जवळपास शेतकऱ्यांना ना समाधान भेटेल असा पाऊस पडला परंतु जिल्ह्यामधील प्रमुख पीक सोयाबीन च उत्पादन पावसाच्या अभावामुळे घटले त्यामुळे शेतकरी बळीराजा संकटात आहे.
हेही वाचा:राज्यात केळी प्रति क्विंटल ५५० ते १५०० रुपये भाव
वाशीम मधील १८ गावामध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन पिकाला पाऊसाने दांडी मारली आणि या पिकाला झटका बसला आणि त्यामुळे उत्पादनात घट झाली.सोयाबीन पिकासाठी जो खर्च लागला आहे किंवा जी मेहनत लागली आहे ती अत्ता पूर्णपणे वाया जाईल त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे आणि यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढेल त्यामुळे शेतकरी राजा खचला आहे.
इकडे सोयाबीनची अशी हालत झालेली आहे आणि दुसरीकडे केंद्र शासनाने दुसरीकडे सोयाबीनचे आयात करण्याचा निर्णय घेतला आणि जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे भाव घटतच चालले आहेत.जे की एकाच आठवड्यामध्ये सोयाबीन या पिकाचे जवळपास अडीच ते तीन हजार रुपये ने दर घसरलेला आहे. सोयाबीनचे दर घसरल्यामुळे अत्ता ज्या व्यापाऱ्यांनी सोयाबीन सोयाबीन खरेदी करून ठेवले आहे ते व्यापारी सुद्धा अडचणीत सापडलेले आहे असे चित्र पाहायला भेटत आहे.
Share your comments