1. बातम्या

शेतकरी राजांनो सावधान! 9 जानेवारीला "या" जिल्ह्यात गारपीटीची शक्यता

गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Due to the vagaries of nature) शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांचे नुकसान झाले होते. या नूतन वर्षात देखील पावसाच्या लहरीपणाचा शेतकरी बांधवांना सामना करावा लागू शकतो असे चित्र तयार होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस व गारपिटीची (Heavy rain and hail) शक्यता वर्तवली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
heavy rainfall and hailstorm in vidarbha region

heavy rainfall and hailstorm in vidarbha region

गतवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे (Due to the vagaries of nature) शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. गेल्या वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील अनेक पिकांचे नुकसान झाले होते. या नूतन वर्षात देखील पावसाच्या लहरीपणाचा शेतकरी बांधवांना सामना करावा लागू शकतो असे चित्र तयार होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस व गारपिटीची (Heavy rain and hail) शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याने 7 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.भारतीय हवामान खात्याच्या या अंदाजामुळे शेतकरी बांधवांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या  अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसू शकतो त्यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झालेले दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने 9 जानेवारी रोजी विदर्भातील काही भागात तुफान गारपीटीची शक्यता (Chance of hailstorm in some parts of Vidarbha) देखील सांगितली आहे. या एकंदरीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होऊ शकते. खरीप हंगामा प्रमानेच रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांचा हातून निसटताना दिसत आहे.

2021 या संपूर्ण वर्षात पावसाच्या लहरीपणाचा राज्याने सामना केला आहे, खरीप हंगामात आलेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान शेतकरी बांधवांचे झाले होते. 2021 मध्ये झालेल्या अवकाळी मुळे उत्पादनात घट नमूद करण्यात आली होती. खरीप हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकरी राजा रब्बी हंगामातुन काढण्याचे स्वप्न बघत होता. मात्र शेतकऱ्यांच्या या स्वप्नांना पुन्हा एकदा अवकाळी ग्रहण लावणार की काय असा प्रश्न आता उभा झाला आहे. भारतीय हवामान खात्याने सांगितलेला अंदाज जर सत्यात उतरला तर यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच शेतकरी बांधवांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. यामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 7 जानेवारी ते 11 जानेवारी या काळात पावसाळी वातावरण बघायला मिळू शकते. यामुळे पुन्हा एकदा रब्बी पिकांवर रोगराईचे सावट पसरू शकते. राज्यातील विदर्भ प्रांत समवेतच उत्तर महाराष्ट्र आणि दुष्काळग्रस्त भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यात देखील अवकाळी पाऊस समवेतच गारपीट हजेरी लावण्याची दाट शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

विदर्भातील पूर्वेकडच्या प्रदेशात गारपीटीची शक्यता अधिक असल्याचे नागपूर हवामान खात्याच्या प्रादेशिक विभागाने यावेळी नमूद केले आहे. विदर्भातील पश्चिम भागात विशेषता अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. त्यामुळे या अवकाळी चा सर्वात जास्त फटका विदर्भात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षी अस्मानी संकटामुळे बळीराजा पुरता हतबल झाला होता पुनश्च एकदा तयार झालेल्या वातावरणामुळे बळीराजाच्या संकटात भर पडताना दिसत आहे. या नूतन वर्षात देखील संकटाची मालिका संपतांना नजरे पडत नसल्याने शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडला आहे.

English Summary: in vidarbha on 9 january there will be heavy rainfall and hailstorm Published on: 08 January 2022, 12:10 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters