काळा तांदूळ हा आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे.त्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असून शरीरासाठी हा खूपच फायदेशीर आहे.
या काळात तांदळाचीवेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांनीपारंपारिक पद्धतीच्या भातशेतीलाजास्त उत्पन्न देणाऱ्या भात पिकाची लागवड करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यात प्रथमच औषधी गुणधर्म असलेल्या काळा भात लागवडीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे.
शासनाचा कृषी विभाग, आत्मा व तोरणा शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून तब्बल वीस एकर क्षेत्रावर काळा भात लागवडीचे प्रात्यक्षिके घेण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी धनंजय कोंढाळकर यांनी सांगितले. कृषी विभागाच्या कृषी संजिवणी मोहिमेच्या माध्यमातून व तोरणा ॲग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी च्या मदतीने सर्व शेतकऱ्यांनी काळा भाताच्या औषधी गुणधर्माविषयी माहिती दिली व काळा तांदळाच्या लागवडीसाठी प्रेरित केले.
शेतकऱ्यांना काळ या भाताच्या लागवडीसाठी कालीपत्ती व चाको हे वाण उपलब्ध करून देण्यात आले. या काळ या तांदूळ मध्ये बऱ्याच प्रकारचे औषधी गुणधर्म देखील असतात. याच्या नियमित सेवनाने कर्करोग व हृदयरोग देखील टाळता येऊ शकतात तसेच शरीरातील वाढलेल्या चरबीचे प्रमाण देखील कमी करता येते.या तांदळाचे साधारणपणे 110 ते 150 दिवसांत एकरी 13 ते 15 क्विंटल एवढे उत्पादन येते. इतर तांदळापेक्षा उत्पादन कमी असले तरी याला नेहमीच भातापेक्षाचार ते पाचपट अधिक भाव मिळतो. याच्या औषधी गुणधर्मांमुळे या तांदळाला विदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे.साधारणपणे 200 ते 250 रुपये प्रति किलो या दराने त्याची विक्री होते.
याच्या बियाण्याची किंमत देखील जास्त असून एका किलोला 400 ते 300 रुपये एवढा भाव आहे.वेल्हा तालुक्यात भात शेती साठी असणाऱ्या कमी जागेमध्ये तेवढ्याच कष्टात काळा भात शेती मधून शेतकऱ्यांना चार ते पाचपट अधिक उत्पन्न मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त क्षेत्रावर काळा भाताची लागवड करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
Share your comments