1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रिय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन चौथा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या येऊ घातलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट मिळू शकते, असे मानले जात आहे
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली जाऊ शकते. या अर्थसंकल्पामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग करण्यात येतात. परंतु पी एम किसान योजना अंतर्गत दिली जाणारी रक्कम वार्षिक सहा हजार वरून आठ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.
म्हणजे शेतकऱ्यांना वार्षिक दोन हजार रुपयांचा अतिरिक्त रक्कमआता मिळू शकते.
डिझेल आणि पेट्रोलचे भाव गगनाला पोहोचल्याने शेतीच्या खर्चामध्ये आधीच वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याची घोषणा केली जाऊ शकते असे मानले जात आहे. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत जर वाढ झाली तर वाढत्या महागाई मध्ये होरपळणाऱ्या शेतकरी वर्गाला थोडासा का होईना दिलासा मिळू शकतो.
आपल्याला माहित आहेच की या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार याप्रमाणे तीन हप्त्यात विभागून दिली जाते.
Share your comments