पंतप्रधान मुद्रा योजना ही एखाद्याला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा असलेला व्यवसाय वाढवायचा असेल त्यांच्यासाठी फायदेशीर अशी योजना आहे.
पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत दोन आठवड्यात उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात लोकसभेत दिली.
या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात भाजपचे सौमित्र खान यांनी मूळ प्रश्न विचारला होता. या संबंधीचा पुरवणी प्रश्न भाजपचा रक्षा खडसे यांनी विचारला.
पंतप्रधान मुद्रा योजना च्या माध्यमातून लहान व मध्यम उद्योगांसाठी तसेच प्रक्रिया उद्योगांसाठी किती दिवसात बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे,अशी विचारणा त्यांनी केली. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत कराड म्हणाले की, डेरी व इतर प्रक्रिया उद्योगांसाठी या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत उद्योजकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास केवळ दोन आठवड्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
दरम्यान लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना त्यांनी सदस्यांच्या पुरवणीप्रश्नांना योग्य रीतीने उत्तरे न दिल्यामुळे प्रश्नोत्तराचा तास सुरू असताना तंबी दिली.
Share your comments