1. बातम्या

धक्कादायक! बोकडाचा नाही तर घेतला चक्क माणसाचा बळी, काय आहे नेमकं हे प्रकरण

देशात अनेक राज्यात काही रूढी परंपरा अस्तित्वात आहेत, आंध्रप्रदेश राज्यात देखील संक्रांतीच्या वेळी बोकडांची बळी देण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. चित्तूर जिल्ह्यात देखील या वर्षी संक्रांतीनिमित्त बोकडांची बळी देण्याचा उत्सव आयोजित केला गेला होता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image courtesy-youtube

image courtesy-youtube

देशात अनेक राज्यात काही रूढी परंपरा अस्तित्वात आहेत, आंध्रप्रदेश राज्यात देखील संक्रांतीच्या वेळी बोकडांची बळी देण्याची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे. चित्तूर जिल्ह्यात देखील या वर्षी संक्रांतीनिमित्त बोकडांची बळी देण्याचा उत्सव आयोजित केला गेला होता

मात्र या उत्सवात बोकडाचा बळी देताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या उत्सवात बोकडाचा बळी देण्याऐवजी बोकड्याला पकडलेल्या माणसाचा गळा कापण्यात आला. गळा कापल्या मुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असून व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मदनपल्ली तालुक्यामध्ये वलसापल्ली गावात दरवर्षी यल्लम्मा देवीच्या मंदिरात भाविक संक्रांतीनिमित्त बोकडांची बळी देत असतात. सालाबादाप्रमाणे यंदा देखील यल्लमा देवीच्या मंदिरात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत होता. मात्र, बोकडाची बळी देताना एका खाटिकने चक्क बोकड्या पकडलेल्या माणसाचाच गळा कापल्याचा धक्कादायक प्रकार यावर्षी या मंदिरात घडलेला असून परिसरात मोठी हायहाय व्यक्त केली जातं आहे.

वलसापल्ली गावात यल्लमा देवीच्या मंदिरात संक्रांतीच्या उत्सवानिमित्त बोकड्याचा बळी देण्याची प्रथा आहे, त्या अनुषंगाने या वर्षी गावात एका समूहाने चलापती नावाच्या खाटकाला बोकड्या कापण्यासाठी निमंत्रित केले होते. हाती आलेल्या माहितीनुसार चलापती नावाचा खाटीक मद्यपानात धुंद होता. सुरेश नावाचा एक गावातील माणूस बोकड्या कापण्यासाठी चलापती जवळ गेला असता, चलापतीने दारूच्या नशेत बोकड्याचा गळा कापून बळी देण्याऐवजी चक्क सुरेशचा गळा कापला. चलापतीजवळ असलेला सुरा हा चांगला धारदार असल्याने, सुरेशचे जास्त रक्तस्राव झाले. 

सुरेशला ताबडतोब तालुक्याच्या गावी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र रक्तस्राव अधिक झाला असल्याने डॉक्टर देखील सुरेशला वाचवू शकले नाहीत. गावकऱ्यांनी खाटकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस चलापतीने नेमक्या कोणत्या कारणाने सुरेशचा गळा कापला याची चौकशी करत आहेत.

English Summary: in this state take goat holder mans life instead of goat sacrificing Published on: 19 January 2022, 11:55 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters