देशातील केंद्र सरकार तसेच अनेक राज्यातील राज्य सरकारे नागरिकांसाठी विविध योजना राबवित असतात. या योजनांचा उद्देश हा मागासवर्गीय व्यक्तींचा विकास करणे हा असतो. अनेक गरजू लोकांना या योजनेद्वारे मदत केली जाते व त्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. असाच एक कौतुकास्पद उपक्रम उत्तर प्रदेश राज्यातील भाजपा सरकार लवकरच अमलात आणण्याच्या विचारात आहे. उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथ हे राज्यातील गरीब विकलांग व वयस्क व्यक्तींसाठी एक कल्याणकारी योजना आधीपासून चालवीत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी आहे की उत्तर प्रदेश राज्यात विधवा तसेच अनाथ महिला, विकलांग व्यक्ती, वयस्क व्यक्ती यांच्यासाठी एक पेन्शन योजना राज्यातील योगी सरकार चालवित आहे
आता बातमी अशी आहे की या पेन्शन योजनेत लवकरच योगी सरकार एक चांगला बदल करणार आहे राज्यातील योगेश सरकार या योजनेद्वारे जे पेन्शन पात्र व्यक्तींना दिले जाते त्यात वाढ करण्याच्या विचारात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दारिद्र्यरेषेच्या खाली असलेल्या प्रत्येक गरीब व्यक्तीला ह्या योजनेचा लाभ उत्तर प्रदेश राज्यात दिला जात आहे.या योजनेद्वारे पात्र व्यक्तींना 500 ते 1000 रुपयापर्यंत पेन्शन दिली जात आहे. तसेच याशिवाय उत्तर प्रदेश राज्यात योगी सरकार असंघटित क्षेत्रातील सुमारे 2.5 कोटी मजुरांना आणि कुष्ठरुग्णांना डिसेंबर ते मार्च या कालावधीत दरमहा तीन हजार रुपये दिले जाणार आहेत, तसेच 60 लाख नोंदणीकृत मजुरांना दरमहा 500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही वाढीव पेन्शन 1 डिसेंबर 2021 पासून संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात लागू होणार आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थी यांना पेन्शनची रक्कम प्रत्येक तिमाहीत बँक खात्यात पाठवली जाणार आहे.
एकंदरीत राज्यातील योगी सरकारने ही घोषणा करून गरीब जनतेसाठी एक कल्याणकारी कार्य केले आहे. असे असले तरी राजकारणातील जाणकार लोक राज्यातील आगामी इलेक्शन लक्षात घेऊन निर्णय घेतला असल्याचे सांगत आहेत.
कारण कुठलेही असले तरी यामुळे उत्तर प्रदेश राज्यातील गरिबांचा नक्कीच फायदा होणार असे देखील सांगितले जात आहे. राज्यातील अनेक नागरिक ह्या योजनुळे आंनदी झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Share your comments