बदलत्या काळानुसार शेतीत नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले, आता शेतकरी बांधव आधुनिक शेतीची कास धरून चांगले मोठे उत्पादन अर्जित करत आहेत. त्यांच्या कामात केंद्र सरकार तसेच राज्य सरकार त्यांच्या स्तरावर विविध योजना राबवित असतात. याच योजनेचा भाग म्हणून राज्यातील कृषी विभागाने यावर्षी एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला, याद्वारे कृषी विभागाने चक्क कलरफुल भाताची शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. फक्त प्रोत्साहितच नाही केले तर कलरफूल भात लागवड शेतकऱ्यांद्वारे करण्यात आली आणि ही कलरफुल भात लागवड यशस्वी देखील कृषी विभागाने करून दाखवली. आता कृषी विभाग कलरफुल भातशेती राज्यातील इतर भागात देखील वाढवण्याच्या विचारात आहे.
या जिल्ह्यात झाली ही कमाल
राज्यात विशेषतः कोकणात एके काळी मोठ्या प्रमाणात भात शेती केली जात होती, पण वाढते औद्योगीकरण, शहरीकरण, त्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा जसे की रस्ते वीज यामुळे शेतीवर मोठा परिणाम झाला. विशेषता भात शेती यामुळे मोडकळीस आली. परंतु आता पुनश्च एकदा कोकणात भातशेती चा सुगंध दरवळणार आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात पूर्वी भातशेती मोठ्या प्रमाणात केली जात होती, आणि म्हणूनच कृषी विभागाने कलरफुल भात शेती लावण्यासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली त्या अंतर्गत रायगड जिल्ह्यात कलरफुल भातशेतीची योजना यशस्वीरीत्या राबविण्यास कृषी विभाग यशस्वी झाले.
जिल्हा कृषी विभागाने केले यासाठी प्रयत्न
देशात तसेच परदेशात देखील मोठी मागणी असलेल्या काळ्या तांदळाला चारशे रुपये किलोने बाजार भाव प्राप्त होतो. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा कृषी विभागाने शेतकऱ्यांना काळा तांबडा लाल तांदूळ लागवड करण्याची शिफारस केली. या तांदळामध्ये असलेले पोषक तत्व हे मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असल्याने तांदळाला बाजारात मोठी मागणी असते शिवाय या तांदूळला इतर इतर तांदूळपेक्षा जास्त रेट मिळतो, त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी या तांदळाच्या जातींची निवड करण्याची शिफारस केली होती.
या कलरफुल भातशेतीसाठी लागणारे बियाणे हे परराज्यातून मागवण्यात आले होते. कलरफुल भात शेती रायगड जिल्ह्यात यशस्वी करण्यात आली परंतु मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसाचा या भात शेतीला थोडा फटका बसला आहे आणि त्यामुळे उत्पादनात घट होण्याची आशंका व्यक्त केली जात आहे. मात्र असे असले तरी कलरफुल भातशेती येत्या काळात जिल्ह्यातील नव्हे नव्हे तर राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठी देखील एक फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकते. त्यामुळे रायगड जिल्हा कृषी विभागाचा हा उपक्रम यशस्वी ठरला आहे असे मत व्यक्त केले जात आहे.
Share your comments