यंदाचे वरीस धोक्याचं! यावर्षी शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. खरीप पूर्णतः शेतकऱ्यांना निराष करून गेलाय. रब्बी हंगामातील पेरण्या देखील अवकाळीमुळे कमालीच्या लांबल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागात अजूनही पेरण्या अर्धवट आहेत. आणि ज्या भागात पेरण्या झाल्या आहेत त्या भागातील पिकांनी जमिनीबाहेर डोकावताच त्यावर किडिंचा प्रादुर्भाव प्रकर्षाने दिसून येत आहे.
मराठवाड्यात देखील काहीशी अशीच परिस्थिती उभी राहिली आहे. मराठवाड्यातील शेतकरी खरीप हंगामाची भरपाई म्हणुन रब्बी हंगामाकडे पाहत होता पण गहु, ज्वारी,, हरभरा उगवताच त्यावर किडिंचा हल्ला बघायला मिळत होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुनःश्च एकदा भीतीचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. आधीच रब्बीचा पेरा हा अजून पूर्ण झालेला नाही आणि ज्या पिकांचा पेरा झाला आहे त्याची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी पूर्ण धर्म संकटात सापडला आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात परिस्थिती हि अजूनच चिंताजनक आहे येथील जवळपास 25 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात असल्याचे सांगितलं जात आहे आणि म्हणुन वैज्ञानिकांनी शेतकऱ्यांसाठी काही उपाययोजना देखील सांगितल्या आहेत.
मराठवाडयात अवकाळी नंतर ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील रब्बीतील पेरणी झालेली पिके धोक्यात आली आहेत, रब्बीच्या हरभरा पिकावर घाटी अळी, मक्यावर लष्करी अळी, ज्वारी पिकावर लष्करी अळी, गहु पिकावर तांबेरा रोग यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे या रोगावर वेळेवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
हरभरा पिकावरील घाटी अळीचे नियंत्रण
जिल्ह्यात हरभरा पिकाचे क्षेत्र वाढले खरे पण त्यावर घाटी अळीचा प्रादुर्भाव हा जास्त होताना दिसत आहे. ह्यावर नियंत्रण मिवण्यासाठी 5% निंबोळी अर्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे, शिवाय यासाठी कामगंध सापळे देखील बसवण्याचा सल्ला दिला जात आहे. घाटी अळी हि अधिक प्रमाणात पिकावर दिसल्यास इमामेक्टीन बेंझोएट 5% 4 ग्रॅम क्विनॅालफास/10 लिटर पाणी हे प्रमाण घेऊन फवारणी करा.
टीप: कुठलीही फवारणी करताना कृषी विशेषज्ञाचा सल्ला घ्यावा, आम्ही सांगितलेली पद्धत हि केवळ माहिती म्हणुन वापरावी. (संदर्भ टीव्ही 9)
Share your comments