बदलत्या काळानुसार शेतकरी राजा देखील बदलत चालला आहे, आता शेतकरी राजा पारंपरिक पिकांना फाटा देत नकदी पिकांची लागवड करत आहे तसेच पिक हे फेरफार करून लावीत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात देखील असंच काहीस बघायला मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा द्राक्ष लागवड, कांदा तसेच उस लागवडीसाठी ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात उस लागवड ही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते, असे असले तरी यंदा उस लागवडीचे क्षेत्र कमालीचे घटताना दिसत आहे, व जिल्ह्यात कांदा लागवडीचे क्षेत्र लक्षणीय वाढत आहे, त्याचे कारण असे की यंदा कांद्यासाठी पोषक वातावरण आहे.
उस लागवडीला दांडी मारून कांदा लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे याचे अजून एक कारण असे की, भविष्यात उसाच्या दराबाबत शेतकऱ्यांना शाश्वती नाही त्यामुळे जास्त कालावधी घेणारे उस लागवड करण्यापेक्षा कमी कालावधीत तयार होणारं कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना अधिक सोयीचे वाटतं आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना एकाही पिकाचे समाधानीचे उत्पन्न पदरी पडले नाही त्यामुळे त्यांनी खरीप हंगामाची भरपाई काढण्यासाठी नगदी पिक म्हणुन ओळखले जाणारं कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे.
कांद्यासाठी वातावरण आहे एकदम सही…
या महिन्याच्या सुरवातीपर्यंत अवकाळीचे सावट नगर जिल्ह्यासमवेत संपूर्ण राज्यात हाहाकार माजवत होते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, रब्बी हंगामातील पेरण्या देखील लांबल्या होत्या. कांदाच्या उळ्यावर अर्थात रोपावर देखील या अवकाळीमुळे विपरीत परिणाम बघायला मिळाला होता, कांद्याच्या रोपावर करपा समवेत इतर रोगांचा प्रादुर्भाव दिसत होता. त्यामुळे कांद्याचे रोपे बऱ्याचअंशी खराब झाली होती. मात्र अवकाळी आता परतला आहे आणि हा येता पंधरवाडा कांदा लागवडीसाठी उत्तम असल्याचे देखील कृषी वैज्ञानिक सांगत आहेत, त्यामुळे या जुळून आलेल्या समीकरणाचा फायदा घेण्यासाठी शेतकरी बांधव कांदा रोपाची चढ्या दराने खरेदी करून लागवड करत आहेत. सालाबाधाप्रमाणे नगर जिल्ह्यातील शेगाव समवेत अनेक भागात उस लागवडीची धामधूम यंदा बघायला मिळत नाहीय.
आता मात्र शेगाव व आजूबाजूच्या परिसरात कांदा पिक लागवड जोमात सुरु आहे. रब्बी हंगामातील रांगडा कांदा अवकाळीने थोडा का होईना क्षतीग्रस्त केला आहे, त्यामुळे याचा परिणाम उत्पादनावर बघायला मिळेल. म्हणून येत्या भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीचे सत्र सुरु केले आहे. आणि एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचे हे नियोजन यशस्वी ठरेलं असे देखील सांगण्यात येत आहे. म्हणून उस लागवड करण्यापेक्षा बळीराजाने कांदा लागवडीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे.
Share your comments