1. बातम्या

'या' तालुक्यात खत टंचाईमुळे शेतकरीराजा मेटाकुटीला; तालुक्यात कृषी अधिकारी देखील…..

नाशिक जिल्ह्यातील मोसम खोरे परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी भीषण खतटंचाईचे वृत्त समोर आले होते. बागलाण तालुक्यातील शेतकरी खत टंचाईच्या समस्येमुळे पुरते हतबल झाले होते. आता अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात समवेतच राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडतो.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Fertilizer shortage

Fertilizer shortage

नाशिक जिल्ह्यातील मोसम खोरे परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागलाण तालुक्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी भीषण खतटंचाईचे वृत्त समोर आले होते. बागलाण तालुक्यातील शेतकरी खत टंचाईच्या समस्येमुळे पुरते हतबल झाले होते. आता अशीच काहीशी परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. जिल्ह्यात समवेतच राज्यातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडतो.

यावर्षी देखील शेवगाव तालुक्यात नैसर्गिक अवकृपेमुळे आधीच शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे मात्र आता तालुक्यातील शेतकऱ्यांवर मानवनिर्मित संकट ओढावून आले आहे. तालुक्यातील शेतकरी खतांच्या कमतरतेमुळे मोठा परेशान झाला आहे. तालुक्यातील दहीगावने, शहरटाकळी या शिवारात खत टंचाई मोठ्या प्रकर्षाने जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. तालुक्यात जवळपास सर्वत्र रब्बी हंगामातील पिकांसाठी यावेळी खतांची मात्रा देणे महत्त्वाचे आहे, आणि ऐन अशाच वेळी खतांची टंचाई भासत असल्याने शेतकरी राजा हतबल झाला आहे. तालुक्यातील रब्बी हंगामातील जवळपास सर्वच पिके वाढीसाठी तयार झाली आहेत. पिकांना आता चांगल्या वाढीसाठी खतांची आवश्यक मात्रा भेटणे गरजेचे आहे. मात्र सध्या तालुक्यात रासायनिक खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याने, पिकांना योग्य वेळी खतांची मात्रा देणे आता शेतकऱ्यांसाठी अवघड होणार असूनत्यामुळे उत्पादनात मोठी घट घडण्याची शक्यता तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सध्या तालुक्यात 10 26 26,12 32 16, 19 19 19, समवेतच डीएपी खताची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे.

खरीप हंगामात तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते, त्याची नुकसान भरपाई करण्यासाठी शेतकरी राजाने रब्बी हंगामाकडे विशेष लक्ष केंद्रित केले, शेतकऱ्यांना रब्बी हंगामातुन दर्जेदार उत्पादन प्राप्त होण्याची आशा आहे मात्र जर तालुक्यात अशीच खत टंचाई कायम राहिली तर पिकांची जोमदार वाढ होणे अशक्य आहे आणि त्यामुळे साहजिकच उत्पादनात घट होणार आहे. शेतकरी राजा रब्बी हंगामातुन दर्जेदार उत्पादन प्राप्त करण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करत आहे, आणि ऐन रब्बी हंगामाच्या प्रारंभी निर्माण झालेली खत टंचाई बळीराजासाठी डोकेदुखी सिद्ध झाली आहे.

तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामाच्या पिकांच्या वाढीसाठी खतांची शोधाशोध करत वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रवर धाव घेताना दिसत आहेत, यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व अतिरिक्त पैसा खर्च होत आहे. मागच्या रब्बी हंगामात शासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे शेतकरी राजांना खतांची कमतरता पूर्ण हंगामभर भासली नव्हती यंदा मात्र शासन आपल्या कार्यात कुठेतरी कमी पडत असल्याची भावना शेतकऱ्यांद्वारे व्यक्त करण्यात येत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी खतांच्या किमती वधारल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्र जुन्या खतांचा वाढीव दराने खत विक्रीसाठी स्टॉक करत असल्याचा खळबळजनक आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. नवीन खतांचा स्टॉक जोपर्यंत मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत कृषी सेवा केंद्र जुने खत विक्री करणार नाहीत असा संशय शेतकऱ्याद्वारे व्यक्त करण्यात आल्याने तालुक्यात कृषी विभागाद्वारे याविषयी सत्यता पडताळून पाहणे महत्त्वाचे ठरते. मात्र तालुक्यात कृषी अधिकारी कायमस्वरूपी नसून प्रभारी राज अंतर्गत कृषी अधिकारी काम बघत असल्याने खतांच्या तुटवडा संदर्भात आणि जुन्या खतांच्या स्टॉक संदर्भात तातडीने काम होताना दिसत नाहीये.

English Summary: In this district farmers are suffering from fertilizer shortage Published on: 27 January 2022, 10:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters