महाराष्ट्र राज्य द्राक्ष लागवडीसाठी (For grape cultivation) विशेष ओळखले जाते, राज्यातील पश्चिम भागात द्राक्ष लागवड लक्षनीय बघायला मिळते. पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक समवेत इतरही जिल्ह्यात द्राक्षाची मोठ्या प्रमाणात शेती बघायला मिळते. सोलापूर जिल्ह्यातील (In Solapur district) माढा तालुक्यात देखील द्राक्षच्या बागा नजरेस पडतात, या तालुक्यातील मानेगाव परिसरात सध्या बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले दिसत आहेत. या परिसरात सतत दाट धुके व वातावरण बदलामुळे (Due to climate change) द्राक्ष बागांवर डाउनी आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी परिसरात खूपच दाट धुके पडले होते त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत, कारण की यामुळे द्राक्ष बागांवर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. आणि त्यामुळे रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हजारोंचा खर्च हा ठरलेलाच आहे.
डिसेंबर मध्ये हवामानात मोठा बदल दिसून आला काही दिवसांचा अपवाद वगळता इतर सर्व दिवस परिसरात दूषित वातावरण (Contaminated environment) तयार झाले होते, याचा सर्वात जास्त फटका हा द्राक्ष पिकांना बसलेला दिसत आहे. बदललेल्या हवामानामुळे व सतत पडत असलेल्या दाट धुक्यामुळे (Due to fog) द्राक्ष बागांवर डाऊनी (Downy) व भुरी रोगाचा प्रादुर्भाव मोठा वाढला आहे.
या बदललेल्या हवामानाचा द्राक्ष समवेत इतरही पिकांना मोठा फटका बसताना दिसत आहे. परिसरातील कांद्याचे पीक देखील या वातावरणामुळे क्षतिग्रस्त होताना नजरे पडत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी समवेतच कांदा उत्पादक शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडलेले दिसत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape growers) आपली व्यथा मांडताना सांगत आहेत की, द्राक्ष बागांना जोपासण्यासाठी एकरी लाखोंचा खर्च हा ठरलेलाच असतो, आणि मध्येच जर असे हवामान तयार झाले तर खर्चात अजून वाढ होते.
शिवाय एवढा खर्च करून देखील असंच दूषित वातावरण काढणीपर्यंत कायम राहिले तर द्राक्षे पिकातून चांगले उत्पादन प्राप्त होणार नाही. म्हणजेच लाखोंचा खर्च करून पदरी काहीच पडणार नाही. त्यामुळे परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. एकंदरीत परिसरातील ही परिस्थिती बघता शेती करायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभा राहिला आहे.
Share your comments