विजेच्या बाबतीत विचार केला विजेची असलेली प्रचंड थकबाकी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एक बातमी येत आहे ती म्हणजे देशातील तेरा राज्यांमध्ये नागरिकांना विविध संकटाला सामोरे जावे लागणार असून या राज्यांकडे असलेले विज बिल थकबाकी हे एक प्रमुख कारण त्यामागे आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्याला मिळाले एकरी 2 कोटी 80 लाख, रोडच्या भूसंपादनासाठी मोठी रक्कम अदा..
काय आहे नेमके प्रकरण?
मागील विज बिलांचा भरणा न केल्यामुळे पावर सिस्टम ऑपरेशन कॉपोरेशन लिमिटेडने देशातील तेरा राज्यांमध्ये असलेल्या ज्या काही वीज वितरण कंपन्या आहेत त्यांना पावर एक्सचेंज विकण्यास नकार दिला असून यामुळे या राज्यांमध्ये वीज खरेदी करणे आता शक्य होणार नाही. त्यामुळे जर विजेची मागणी वाढली तर संबंधित राज्यांमध्ये वीज कपात वाढेल.
कोणती आहेत ती तेरा राज्य?
यामध्ये मध्य प्रदेश,महाराष्ट्र,कर्नाटक,छत्तीसगड, तामिळनाडू, तेलंगणा, मिझोराम, मनिपुर, बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये असलेल्या वीज वितरण कंपन्यांना पावर एक्सचेंज मधून वीज खरेदी करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे या राज्यांना स्वतःच्या राज्यांमधील उत्पादना शिवाय पर्याय नाही.
म्हणून या राज्यांमध्ये जर विजेची मागणी वाढली किंवा वीज उत्पादनात घट झाली तर वीज पुरवठा खंडित होणार आहे.आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यांनी पावर एक्सचेंजवर वीज खरेदीवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Share your comments