1. बातम्या

पीएम किसान सन्मान योजनेच्या नावाखाली महाराष्ट्रातील २६ हजार अपात्र लोकांची नावे समोर, ११ कोटी निधी सरकारकडे ओळवला जाणार

पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणारी महाराष्ट्र राज्यातील २६ हजार लोकांची नावे समोर आली आहेत. जे की या २६ हजार लोकांच्या बँक खात्यामध्ये जी ११ कोटी रुपयांची रक्कम आहे ती वसूल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिलेली आहे. केंद्र सरकार ची पीएम किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर मानली जाते. महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील २६ हजार अपात्र लोकांची नावे समोर आलेली आहेत. जे की या २६ हजार लोकांच्या बँक खात्यामध्ये ११ कोटी रुपयांचा निधी देखील जमा करण्यात आलेला आहे. जे की हा निधी लवकरच सरकारकडे जाणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
money

money

पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेणारी महाराष्ट्र राज्यातील २६ हजार लोकांची नावे समोर आली आहेत. जे की या २६ हजार लोकांच्या बँक खात्यामध्ये जी ११ कोटी रुपयांची  रक्कम आहे ती वसूल करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिलेली आहे. केंद्र सरकार ची पीएम किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर  मानली  जाते.  महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील २६ हजार अपात्र लोकांची नावे समोर आलेली आहेत. जे की या २६ हजार लोकांच्या बँक खात्यामध्ये ११ कोटी रुपयांचा निधी देखील जमा करण्यात आलेला आहे. जे की हा निधी लवकरच सरकारकडे जाणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे

रायगड जिल्ह्यातील २६,६१८ अपात्र नावे आली समोर :-

पीएम किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी काढलेली होती. मात्र सरकारच्या लक्षात अशा काही गोष्टी आल्या ज्यामुळे या योजनेकडे लक्ष देण्यास सुरू केले. शेतकरी वर्गाव्यतिरिक्त इतर लोक सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ लागली होती. शिवाय काही शेतकरी तर पात्र असून सुद्धा त्यांना लाभ घेता येत न्हवता. सध्याचा अहवाल पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यातील २६,६१८ अशी अपात्र नावे समोर आलेली आहेत जी या योजनेचा लाभ घेत होती. या २६,६१८ लोकांच्या बँक खात्यात देखील ११ कोटी रुपयांचा निधी जमा केलेला आहे. मात्र हा निधी लवकरच सरकरकडे वळवण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे तहसीलदार सचिन शेजल यांनी दिलेली आहे.

रायगड जिल्ह्याच्या तहसीलदारांनी दिली माहिती :-

रायगड जिल्ह्यातील २६,६१८ लोकांमधील ४५०९ अशी लोक आहेत जे लोक income tax भर असल्याचे समोर आले आहे. या ४५०९ लोकांकडून ३.८१ कोटी रुपये येणे असून त्यामधील २.२० कोटी रुपये वसूल देखील करण्यात आले आहेत. तर २२,१०९ अपात्र लोकांकडून ७.३५ कोटी रुपये वसूल देखील करण्यात आले आहेत. जे की यामधील ३४.५४ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत असे रायगड जिल्ह्याचे तहसीलदार सचिन शेजल यांनी प्रतिनिधींना माहिती दिलेली आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची योजना :-

पीएम किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी काढलेली आहे जे की शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी चार महिन्याने २ हजार रुपये म्हणजे वर्षाला ६ हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. हे ६ हजार रुपये शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना दिले जातात.

English Summary: In the name of PM Kisan Sanman Yojana, in front of the names of 26,000 ineligible people in Maharashtra, 11 crore funds will be allocated to the government. Published on: 26 April 2022, 06:18 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters