वेगवेगळ्या कारणाने शेतकरी नेहमी संकटात सापडत आहे. आता शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. वाढत्या उन्हाचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. अचानक मार्चच्या (March) अखेरच्या टप्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) दिला आहे.
उन्हाळ्यामुळे बारामती (Baramati) तालुक्यातील झारगडवाडी येथील तीन शेतकऱ्यांच्या शेळ्या उष्माघाताने दगावल्या आहेत. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. उष्मघातामुळे मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागला आहे.
उन्हामुळे भर दुपारी एकाच वेळी झारगडवाडी शिवारातील तीन शेळ्या दगावल्याची घटना मंगळवारी घडली आहे. यानंतर शेतकरी गोपीनाथ बोरकर यांनी संबंधित घटनेची पशूसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अवघ्या काही वेळातच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली होती. या तीन शेळ्यांचा मृत्यू (Death of goats) हा उष्मघातानेच झाल्याचे पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी : बँकेची कर्जमर्यादा वाढवली; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
नुकसान भरपाई : शेतकऱ्यांना पाडव्याच्या मुहूर्तावर मिळणार गोड बातमी..!
उन्हाळ्यात शेळ्यांची अशी घ्या काळजी
उन्हाळ्यात 11 ते 4 या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे चारून आल्यानंतर शेळ्यांना सावलीतच बांधावे. चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू नये. शक्यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा दिलेला उत्तम. शेळ्यांना थंड, स्वच्छ पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. 24 तास जास्त पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी.
शेतकरी संतापला! थेट मार्केटच केले बंद, जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण?
Kisan Credit Card: शेतकरी शेतीव्यतिरिक्त "या" कामांसाठी KCC कडून कर्ज घेऊ शकतो
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा
Share your comments