आपल्या शेजारील श्रीलंका या राष्ट्राचा विचार केला तर श्रीलंकेचे अर्थव्यवस्था ही पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. परंतु कोरोनापरिस्थितीमुळे पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला असून सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे.
जर भाजीपाला आणि खाद्यपदार्थांचा विचार केला तर विश्वास बसणार नाही अशा पद्धतीचे भाववाढ झालेली आहे. श्रीलंके मध्ये एक किलो मिरची ची किंमत सातशे दहा रुपये,बटाटा प्रति किलो दोनशे रुपये आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे श्रीलंकेवर संकट ओढवले असून तेथे आर्थिक आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
श्रीलंकेमध्ये बीसीआय या संस्थेकडून भाव जाहीर केले जातात. त्यांच्यानुसार एका महिन्यामध्ये भाजीपाला व खाद्य पदार्थांच्या किंमतीत जवळजवळ पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या महिन्याच्या तुलनेत मिरचीच्या भावात 287 टक्क्यांनी वाढ झाली आहे.वांगी,कांदेआणि टोमॅटो यामध्ये अनुक्रमे 51,चाळीस आणि दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती…..
या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेची तिजोरी रिकामी झाली असून विदेशी चलणातकमालीची घट आली आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थाही पर्यटन उद्योगावर अवलंबून असून कोरोणा मुळे पर्यटन व्यवसाय डबघाईला आला आहे. तसेच भीमा मारी नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागत असल्याने सरकारी खर्चात वाढ झाल्याने तसेच कर सुद्धा कमी आल्याने कमाईचे सर्व साधने बुडाले आहेत
त्यामुळे श्रीलंका सरकारने आर्थिक आणीबाणी जाहीर केली असून जागतिक बँकेचे म्हणण्यानुसार श्रीलंके मध्ये कोरोना काळात पाच लाख लोक दारिद्र्यरेषेखाली गेले आहेत. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतीमुळे आर्थिक आणीबाणी लागू केली असून खाद्यपदार्थांचे भाव ठरवण्याचे अधिकार लष्कराला देण्यात आले आहेत.(संदर्भ-सरकारनामा)
Share your comments