1. बातम्या

शेतकरी महिलेची किमया- तीस गुंठ्यात घेतले पाच लाखाचे उत्पन्न

जुलै महिन्यात कोरोना विषाणूचा प्रभाव हा संपूर्ण जगात दिसून येत होता. कोरणा मुळे संपूर्ण जग हे भयग्रस्त झालेल्या होते. त्यामुळे देशभरात अनेकदा लोक डाऊन केले गेले. या लोक डाऊन मुळे अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली. संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. बरेच जण हा प्रश्न पडला होता की भविष्यात काय करायचे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra

जुलै महिन्यात कोरोना विषाणूचा प्रभाव  हा संपूर्ण जगात दिसून येत होता. कोरणा मुळे संपूर्ण जग हे भयग्रस्त झालेल्या होते. त्यामुळे देशभरात अनेकदा लोक डाऊन केले गेले. या लोक डाऊन मुळे अनेक जणांच्या नोकरीवर गदा आली. संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. बरेच जण हा प्रश्न पडला होता की भविष्यात काय करायचे.

मात्र अशा गंभीर परिस्थितीत जिल्ह्याच्या मावळ परिसरातील एका महिला शेतकरी ने लोक डाऊन ला न जुमानता एक संधी समजून स्वतःला सिद्ध करून दाखवले. या महिलेचे नाव आहे रूपाली नितीन गायकवाड. रूपालीताई यांनी आपल्या शेतामध्ये कलिंगड आणि काकडीचे दुहेरी पीक घेतले. त्यांच्याकडे असलेल्या अवघ्या तीस गुंठ्यांत यांनी तब्बल पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. मावळ परिसर हा पाहिला तर तसा भाताचे पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे कुठल्याही प्रकारचे इतर पीक घेत नाहीत.

हेही वाचा :कांद्याचे दर गडगडले आवकही कमी

मात्र रूपालीताई यांना कलिंगड विक्रीच्या कार्यक्रमाचे महासंकट आले आणि त्याच्या काळातच करणाच्या पार्श्वभूमीवर लोक डाऊन करण्यात आले. अशा गंभीर परिस्थितीत रूपाली यांनी हार न मानता लोक डाऊन ला ही एक संधी मानून त्यांच्या शेताच्या बांधावर व्यापाऱ्यांना पंधरा रुपये किलोने कलिंगड विक्री केली. मात्र त्यात झाल्याने त्यांनी त्याच क्षेत्रात काकडीचे उत्पन्न घेऊन त्यांना तेच गुंठ्यात महिन्याकाठी दहा टन काकडीचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. तेव्हा त्यांच्या एका तोडणीला 800 ते 900 किलो काकडी मिळत होती. रूपालीताई यांनी तीस गुंठ्यात दुहेरी पीक घेऊन त्याला एक लाख रुपये खर्च करून त्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला. दुहेरी पीक घेतल्याने त्याचा फायदा होतो असे रूपाली ताई यांनी दाखवून दिले.

English Summary: In small agriculture land making good money Published on: 09 December 2020, 05:11 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters