सांगली बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या हळद सौद्या मध्ये राजापुरी हळदीला अठरा हजार रुपयांचा उच्चांकी दर मिळाला आहे. बावची येथील विजयकुमार चव्हाण यांची ही हळद होती. यावर्षी हळदीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून आनंद आणि समाधान व्यक्त केले जात आहे
सांगली बाजार समिती चा विचार केला तर हळदीची आवक आणि जावक चांगले आहे.बुधवारीझालेल्या हळद विक्रीमध्ये वाळवा तालुक्यातील बावची येथील शेतकरी विजय चव्हाण या शेतकऱ्यांच्या हळदीला बुधवारी झालेल्या सौद्यात एका क्विंटलला 18 हजार रुपयांचा दर मिळाला.
जर हे सगळ भावाचे सरासरी पाहिली तर क्विंटलला कमीत कमी सहा हजार आणि जास्तीत जास्त 18000 व सरासरी बारा हजार रुपयाचा भाव मिळाला आहे.
सांगली बाजार समितीमध्ये हळद खरेदीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात व्यापार येत आहेत त्यामुळे हळदीला चांगला भाव मिळत असून त्यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळू शकणार आहेत. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या हळद जास्तीत जास्त विक्री साठी बाजार समितीमध्ये घेऊन यावी अशा आशयाच्या आव्हान सभापती दिनकर पाटील तसेच सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे.
तसेच चालु हळदीवर आणि बेदाणा या शेतमालावर शासनाची तारण कर्ज योजना ही सुरु आहे, या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे दिनकर पाटील यांनी यावेळी सांगितले.(संदर्भ-हॅलोकृषी)
Share your comments