राज्यात मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड केली जाते, फळबाग पिकांपैकी प्रमुख असलेले द्राक्षबागा (Vineyard) राज्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. राज्यातील पश्चिम भागात द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेतले जाते, पश्चिम महाराष्ट्रातील नासिकला द्राक्ष उत्पादनामुळे वाईन सिटी म्हणून ओळखले जाते (Nashik is known as the Wine City for its grape production). राज्यातील बहुतांश शेतकरी द्राक्ष पिकावर अवलंबून आहेत. मात्र यावर्षी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे (Dealing with natural disasters) जावे लागत आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात उत्पादनाविषयी संभ्रमता (Confusion about the production) निर्माण झाली आहे
या हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसत आहे, मागच्या वर्षातील ऑक्टोबरपासून कधी अतिवृष्टी (Sometimes heavy rain) तर कधी अवकाळी यामुळे द्राक्ष बागांवर विविध आजारांचे सावट पसरलेले दिसत होते, त्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी लाखोंचा खर्च केला तेव्हा कुठे द्राक्षबागा आता बऱ्या स्थितीत पोहोचल्या आहेत. मात्र आता पुन्हा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नवीन संकटांना सामोरे जावे लागत आहे. सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा या काढणीच्या तोंडावर असतानाच या द्राक्ष बागांवर वटवाघळांचा हल्ला बघायला मिळत आहे. परिस्थिती एवढी भयावह आहे की द्राक्षबागांवर वटवाघळांचे थवेच्या थवे हल्ला करत (Attacks of Bat on vineyards) आहेत. कसेबसे निसर्गाच्या अवकृपेने सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या बागा वाचवल्या आणि हजारोंचा खर्च करून तिथपर्यंत आपल्या द्राक्ष बागा जोपासल्या आहेत, मात्र या वटवाघळांच्या हल्ल्यामुळे तोंडचा घास वाया जाईल की काय? अशी कुशंका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात घर करत आहे.
मध्यंतरी संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी (Untimely Rain) नामक संकट शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले होते सांगली जिल्ह्यात देखील अवकाळीचे विक्राळ रूप बघायला मिळाले होते, अवकाळी च्या काळात जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अवकाळी व त्यामुळे तयार झालेल्या वातावरणापासून आपल्या बागा संरक्षित करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च केला, तेव्हा परिस्थिती एवढी बिकट होती की शेतकऱ्यांना आपल्या संपूर्ण बागांना आच्छादन करावे लागले होते. आता देखील शेतकऱ्यांना वटवाघळाचे हल्ले परतवून लावण्यासाठी संपूर्ण द्राक्ष बागांना जाळी मारण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे तेव्हा केलेला हजारो रुपयांचा खर्च आणि आता होणारा हजारो रुपयांचा खर्च यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडणार आहे. आणि एवढी मोठी प्रयत्नांची पराकाष्टा करून देखील द्राक्ष उत्पादक शेतकरी (Grape growers) तरणार की मरणार हे पूर्णता उत्पादनावर अवलंबून असेल. आता सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा अवघ्या पंधरवाड्यात काढणीसाठी येतील तेव्हा द्राक्ष पासून किती उत्पादन मिळते हे बघण्यासारखे असेल.
Share your comments