हळद हे एक नगदी पीक आहे. दैनंदिन जीवनात हळदीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हळदीचा वापर जेवणामध्ये तसेच आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा च्या वर्षी बदलत्या वतावरणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर गारपीट आणि अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरण यामुळे सुद्धा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे.
सांगली बाजारपेठे मध्ये 2 प्रकारच्या हळदीची आवक:
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र हळदीचा सिजन सुरू झाला आहे. हळदीची महत्वाची बाजारपेठ म्हणून सांगली ची ओळख आहे. हंगामाच्या सुरुवातीच्या काळात दोन प्रकारच्या हळदीची आवक सुरू झाली आहे. त्यापैकी सांगली बाजारात राजापुरी हळदीला विक्रमी भाव मिळाला आहे.यंदा च्या वर्षी बदलत्या वतावरणाचा परिणाम आणि निसर्गाचा लहरीपणा या मुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे हळदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत असे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. सांगली बाजारपेठे मध्ये 2 प्रकारच्या हळदी ची आवक आली आहे त्यामधील परपेठची आणि राजापुरी हळद असे दोन प्रकार आहेत. दररोज सांगली मार्केट कमिटी मध्ये 7 ते 9 हजार पोत्यांची आवक येत असून चांगल्या प्रतीच्या हळदीला बाजारात 9 हजार रुपये क्विंटल ते 10 हजार रुपये क्विंटल एवढा भाव मिळत आहे.
हळदीच्या भावात तेजी कायम:-
यंदा च्या वर्षी अवकाळी पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे शिवाय यंदा च्या वर्षी उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे बाजारात हळदीची मागणी वाढलेली आहे परंतु आवक नसल्याने हळदीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.त्यामुळे पुरवठा कमी असल्यामुळे हळदीला विक्रमी भाव मिळाला आहे. हळदीच्या हंगामाच्या सुरवातीलाच हळदीला चांगला भाव मिळालेला आहे. शिवाय आता मार्च आणि एप्रिल महिन्यात सुद्धा हळीदीचे भाव वाढतानाच दिसत असल्याने हळद उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.
सांगली बाजारात राजापुरी आणि परपेठची ची हळद दाखल:-
महाराष्ट्र राज्यामध्ये सांगली आणि हिंगोली या जिल्ह्यात हळदीचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते. हिंगोली जिल्ह्याची बाजारपेठ वसमत येथे आहे. सध्या सांगली बाजार समिती मध्ये हळदीची आवक वाढू लागली आहे. सांगली बाजार समिती मध्ये 2 प्रकारच्या हळदीच्या जाती सामील झाल्या आहेत एक म्हणजे राजापुरी हळद आणि दुसरी म्हणजे परपेठची हळद. सांगली बाजारपेठ मध्ये राजापुरी हळदीला उच्च भाव मिळाला आहे.राजापुरी हळदीला सरासरी 8 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर आहे तर परपेठ या हळदीला 6 हजारापर्य़ंतचा दर मिळत आहे.
हंगाम काळ 3 महिन्यांचा:-
सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हळदीच्या काढणी ला सुरुवात झाली आहे. ह्या वर्षी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असली तरी यंदा च्या वर्षी हळदीच्या भावात भरघोस वाढ झालेली आहे. तसेच फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यात हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढते परंतु यंदा च्या वर्षी हळदीचे भाव स्थिर राहून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Share your comments