यावर्षी देशातील शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे. कधी अवकाळी (Untimely Rain), कधी गारपीट (Hailstorm) तर कधी बदलते हवामान (Climate change) या सर्व्या गोष्टींचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. नैसर्गिक आपदामुळे (Due to natural disasters) पिकांच्या उत्पादनात (In crop production) तर घट घडूनच आली आहे याशिवाय बाजारात शेतमालाला कवडीमोल दर मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मध्य प्रदेश मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच राज्यातील रतलाम जिल्ह्यात (In Ratlam District) कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे पार कंबरड मोडलं आहे. काही दिवसापासून रतलाम बाजार समितीत कांद्याची मोठी आवक बघायला मिळत आहे, म्हणुन कांद्याच्या भावात कमालीची घसरण (Extremely low) बघायला मिळत आहे. परिस्थिती एवढी बिकट बनली आहे की बाजार समितीत कांद्याला 100 रुपये क्विंटल एवढा कमी बाजारभाव (Market price) मिळत आहे. ह्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्च देखील मिळत नाही आहे परिणामी अनेक कांदा उत्पादक शेतकरी आपला सोन्यासारखा कांद्याला बाजारात तसाच सोडून घरी परतत आहेत.
मागच्या आठवड्यापासून रतलाम कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन कांद्याची आवक चांगलीच वधारली (Increased) आहे. हाती आलेल्या माहितीनुसार बाजार समितीत रोज दोनशे ट्रॉली हून अधिक नवीन कांद्याची आवक येत आहे. म्हणून कमी दर्जा असलेल्या कांद्याला व्यापारी खरेदी करत नाहीयेत. तर कांद्याला मात्र शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान भाव मिळत असल्याचे चित्र दिसत आहे, असे असले तरी कांद्याची विक्री किरकोळ बाजारात (In the retail market) 30 ते 40 रुपये किलोने होत आहे.
कांदा विक्री करण्यासाठी आलेले कांदा उत्पादक शेतकरी (Onion growers) सांगत आहेत की, कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने वाहतुकीचा खर्च काढने देखील मुश्किलीचे बनले आहे. शिवाय विक्रीसाठी आणलेला कांदा दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करून देखील विकला जाऊ शकत नसल्याने, कांदा उत्पादक शेतकरी आपला सोन्यासारखा माल तसाच बाजार समितीत सोडून येत आहेत. कांदा उत्पादक शेतकरी, बदलत्या हवामानामुळे कांदा खराब होऊ शकतो म्हणून मिळेल त्या बाजार भावात कांदा विक्री करत आहेत. कांदा व्यापारी (Onion traders) शेतकऱ्यांच्या या असहायतेचा फायदा उचलत आहेत. एकंदरीत परिस्थिती बघता रतलाम कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार (Arbitrary management) उघड होत आहे, शिवाय यामुळे फक्त शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे एवढे मात्र नक्की.
Share your comments