उत्तर प्रदेश मध्ये रामपूर -बामपुर येथील शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शिमला मिरची च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत.
या मिरचीचे चांगले उत्पादन पाहून आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी देखील या सिमला मिरचीचे लागवड तंत्रज्ञान आणि उत्पादनाची पद्धत याबद्दलचे बारकावे शिकत आहेत. रामपूर बामपूर येथील शेतकरी महेश यांनी अडीच बीघा क्षेत्रांमध्ये सपाटा जातीची शिमला मिरचीची लागवड केली आहे. या मिरचीची रोपवाटिका त्यांनी नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान तयार केली होती. मिरचीची पुनर्लागवड त्यांनी जानेवारी मध्ये केली व मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात मध्ये या मिरचीचे उत्पादन सुरू झाले.
नक्की वाचा:शेतकरी बांधवानो गव्हाची विक्री की साठवणूक; जाणुन घ्या बाजारातील चित्र
कीटकनाशके, खते पाणी पाणी इत्यादींची व्यवस्थापनासाठी जवळ जवळ वीस हजार रुपये त्यांना खर्च आला आहे. एक एकर मध्ये जवळजवळ 25 ते 30 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. तसेच ते या शिमला मिरची ला इटावा, कानपूर व आग्रा इत्यादी शहरांमध्ये नेवून देखील विक्री करत आहेत.
तो बाजारामध्ये 50 रुपये प्रति किलो या दराने ही मिरचीची विक्री होत आहे. या माध्यमातून त्यांना अडीच बिघ्यात अडीच ते तीन लाखांपर्यंतची उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरुवात होऊन एवढ्यात 50 हजार रुपयांची सिमला मिरचीची विक्री केली आहे.
वर्षभर करू शकतात भाजीपाल्याची शेती
याबाबतीत महेश म्हणतो की पारंपारिक शेतीमध्ये लागणारा खर्च काढणे सुद्धा मुश्किल होतहोते. किसान पाठशाला मध्ये उद्यान विभागाद्वारे भाजीपाल्याची शेती कशी करावी याबाबतची माहिती घेतली. तसेच या विभागाच्या सहकार्याने हळूहळू भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ करणे सुरू केले. आता ते सिमला मिरची, टोमॅटो, काकडी आणि भाजीपाला सारखी पिके हंगामानुसार घेतात.
नक्की वाचा:Business Idea: शेतकरी पुत्रांनो "हा" व्यवसाय ठरू शकतो तुमच्यासाठी वरदान; वाचा या विषयी
शेतकऱ्यांनी आपले आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. कमीत कमी खर्चात चांगला नफा या माध्यमातून मिळतो. महेश सारख्या शेतकऱ्यांकडून इतर शेतकऱ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. तसेच शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन शेतकरी स्वतःच्या जीवनात समृद्धी आणू शकतात असे सहाय्यक उद्यान अधिकारी धर्मेन्द्र कुमार यांनी सांगितले.
Share your comments