शेतकरी सध्या पारंपरिक शेती सोडून विविध फळबाग लागवडीकडे वळत आहेत. त्यातही महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात होती.
परंतु काही वर्षांपासून डाळिंबावर मर आणि तेल्या रोगाने थैमान घातल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडले होते. म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी डाळिंब फळबाग आला पर्याय म्हणून सीताफळ आणि पेरू लागवड इकडे आपला मोर्चा वळवला. त्याचाच परिणाम म्हणून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी डाळिंबाला पर्याय म्हणून पेरू व सीताफळाची लागवड केली. या दोघी फळांना बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
इंदापूर तालुक्यात वाढू लागले सीताफळ व पेरूचे क्षेत्र…..
जर आपण इंदापूर तालुक्याचा विचार केला तर या तालुक्यातील गोतोंडी, कडवनवाडी,निमगाव केतकी, शेळगाव या व इतर गावांमध्ये डाळिंबाचे क्षेत्र जास्त होते. परंतु डाळिंबावर मर व तेल्या रोगामुळे डाळिंब फळबागा धोक्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून त्या जागेवर डाळिंब शेतीला पर्याय म्हणून पेरू व सीताफळाची लागवड केली. त्यामुळे या तालुक्यात डाळिंबाचे क्षेत्र घटून पेरू आणि सीताफळाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
डाळिंब आणि पेरू व सीताफळ यामध्ये उत्पादन खर्चाचा विचार केला तर यामध्ये फार मोठा फरक आढळतो. या दोन्ही फळबागांच्या तुलनेत डाळिंब उत्पादन खर्च जास्त आहे.परंतु डाळिंबाच्या तुलनेत या दोन्ही प्रकारच्या फळांनाचांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
Share your comments