राज्यात शेतकरी बांधव नवीन पीक पद्धतीचा अवलंब करून चांगली मोठी कमाई करत आहेत, याचेच एक उदाहरणपुणे जिल्ह्यातून आता समोर येत आहे. वेल्हे तालुक्यात शेतकरी बांधवांनी काळ्या भाताची यशस्वी लागवड करून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. काळा तांदूळ हा मानवी शरीराला खूपच फायदेशीर असल्याने याची मागणी बाजारात सदैव बनलेली असते, याच्या औषधी गुणधर्मांमुळे हा तांदूळ आपल्या साध्या तांदळापेक्षा महाग विकला जातो त्यामुळे याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर सिद्ध होताना दिसत आहे.
काळ्या भाताची उपयोगिता लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला, या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन समिती अर्थात आत्मा यांच्या संयुक्त पुढाकाराने तसेच तोरणा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यात जवळपास वीस एकर क्षेत्रावर काळ्या भाताची यशस्वी लागवड करण्यात आली. हा एक प्रायोगिक तत्त्वावर तयार करण्यात आलेला प्रयोग होता, मात्र याच यशाने कृषी विभाग व संबंधित शेतकरी गदगद झालेले यावेळी नजरेला पडले.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की कृषी विभागाने आपल्या कृषी संजीवनी या मोहिमेतून तोरणा शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळ या भाताच्या लागवडीसाठी प्रोत्साहित केले, तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काळ्या तांदुळाचे औषधी गुणधर्म तसेच याच्या मागणीची व मार्केटिंगची सखोल माहिती या उपक्रमाअंतर्गत देण्यात आली. कृषी विभागाने काळा तांदळाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना फक्त प्रोत्साहित केले असे नाही तर त्यांना काळ्या तांदळाच्या कालीपत्ती व चाकू हे वान देखील उपलब्ध करून देण्यात आले. कृषी विभागाने काळ्या भाताची लागवड ट्रायल स्वरूपात पुणे जिल्ह्यामधील वेल्हे तालुक्यातील चिरमोडी, मार्गासनी, वांगणी, वांगणीवाडी, अडवली, अस्कवडी, वाजेघर या गावात लागवड केली. कृषी विभागाचा हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने भविष्यात या परिसरात याची मोठ्या प्रमाणात लागवड बघायला मिळेल असे चित्र दिसत आहे. कृषी विभागाच्या या प्रयोगामुळे परिसरात भविष्यातील शेतीसाठी पायंडा घालण्यात आला आहे एवढे नक्की.
काळा भात हा साध्या भातापेक्षा अधिक महाग विकला जातो कारण की या भातात खूप मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आढळतात. हा भात 250 रुपये प्रति किलो पर्यंत विकला जातो. असे असले तरी यांची शेती अद्याप तरी खूप कमी प्रमाणात केले जाते त्यामुळे या भाताची लागवड शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर ठरू शकते कृषी विभागाचा हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने कृषी क्षेत्रात मोठा आमूलाग्र बदल घडून येईल एवढे नक्की.
Share your comments