1. बातम्या

पिंपळगाव बसवंतमध्ये कांद्याला प्रति क्किंटल ५ हजारांचा दर

यावर्षी कांद्याचे पाहिजे तेवढे उत्पादन होऊ शकले नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे दक्षिण भारतात जितकी कांदा लागवड झालेली होती, त्यावर पावसाचा मारा बसल्याने पुर्ण उत्पन्नावर पाणी फेरले. तसेच आपल्याकडील शेतकऱ्यांना जो कांदा चाळीमध्ये ठेवलेला होता तो कांदाही बऱ्यापैकी खराब झाला.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


यावर्षी कांद्याचे पाहिजे तेवढे उत्पादन होऊ शकले नाही. त्याला मुख्य कारण म्हणजे दक्षिण भारतात जितकी कांदा लागवड झालेली होती, त्यावर पावसाचा मारा बसल्याने पुर्ण उत्पन्नावर पाणी फेरले. तसेच आपल्याकडील शेतकऱ्यांना जो कांदा चाळीमध्ये ठेवलेला होता तो कांदाही बऱ्यापैकी खराब झाला त्यामुळे मागणीच्या मानाने कांद्याचा पुरवठा हा फारच कमी होत आहे.  त्याचा परिणाम कांदा दरवाढ होण्यावर झाला आहे.

दरम्यान केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये संतापाची लाट होती. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलने केली होती. पण दक्षिण भारतात झालेल्या अतिपावसामुळे कांद्याचे उत्पन्नात घट झाली. शिवाय नैसर्गिक स्थितीमुळे कांद्यात घट अधिक होती. यामुळे निर्यात वाढली होती. पण वाढत्या दरामुळे सरकारने निर्यात बंदी केली. या निर्यात बंदीमुळे बाजारात कांद्याच्या भावावर परिणाम होईल अशी शंका होती. पण बाजारातील दर पाहता निर्यातीचा परिणाम झालेला दिसत नाही. सोमवारी पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्यास उच्चांकी दर मिळाला.  साधरण ५१५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळून कांद्याने उच्चांकी भाव घेतला. त्यामुळे चांगला कांदा साठवणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांवर समाधानाचे हास्य दिसून येत आहे. पिंपळगाव बाजार समितीत सरासरी  ३ हजार ८५१  रुपये प्रति क्विंटल विक्री झाली.

बाजार समितीत सोमवारी जवळजवळ 991 वाहनांद्वारे कांद्याची आवक झाली होती. मागणीच्या मानाने अत्यल्प पुरवठा होत असल्याने कांद्याला अशाप्रकारे दर मिळत आहे. यावर्षी कांदा बियाण्याचे दर अतिशय वाढल्याने पुढील वर्षी कांदा उत्पादन किती प्रमाणात होते याची कुठल्याही प्रकारची शाश्वती आता राहिली नाही त्यामुळे कांदा दर वाढतच राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाकलेली कांद्याचे बियाणे झालेल्या अतिपावसामुळे खराब झालेत व पावसाळी लागवड केलेला कांदा ही ह्यावर्षी बऱ्याच प्रमाणात खराब झाला आहे.

English Summary: In Pimpalgaon Baswant, the price of onion is Rs. 5,000 per quintal Published on: 29 September 2020, 04:29 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters