सुदामा साहू ओरिसातील बरगड जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत.त्यांच्या परिवाराच्या आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याकारणाने केवळ शेती आणि मजुरी त्यांचे वडीलकुटुंबाचा चरितार्थ चालवित होते.परंतु कालांतराने त्यांच्या वडिलांचीतब्येतीत बिघाड झाल्यानेसुदामा याच्यावर कुटुंबाचे सगळी जबाबदारी येऊन पडली.
त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे वयस्कर आजोबाआणि स्वतः सुदामा यांच्या शिवाय घरात कोणी काम करेल असे कोणीच नव्हते.त्यामुळे त्यांना फार कमी वयात शेती आणि मजुरी करावी लागली.त्यामुळे त्यांचे शिक्षणही सुटले. अवघ्या सोळा वर्षाच्या असताना हार न मानता त्यांनी शेतीमध्ये आपले करिअर करायचे ठरवले आणि सुरू झाला शेतीमधील नवनवीन प्रयोगांची शृंखला.
आज सुदामा साऊ यांच्याकडे देशी बियाण्यांची स्वतःची सीड बँक आहे.यामध्ये जवळजवळ एक हजार 100 पेक्षा जास्त वेगवेगळ्या वरायटी चे बियाणे आहे.या बियाण्याचे देशभरात मार्केटिंग करतात व वर्षाला जवळजवळ त्यांचा टर्नवर40 लाखांपर्यंत पोहोचली आहे. तसेच कृषी संबंधित मोठ्या संस्थांमध्ये देखील त्यांच्या बियाण्यावर संशोधन होत आहे.
कशी सुरु केली देशी बियाण्याची सीड बँक?
देशी बियाणे जमा करण्यासाठी सुदामासाहू हे गावा गावात जायचे.तिथे शेतकऱ्यांना भेटूनच त्यांच्याकडून बियाणे खरेदी करायचे.तू काही दिवसानंतर त्यांना समजले की जास्त दिवसअशा पद्धतीने काम करता येणार नाही. त्यांना कळून आले की ते प्रत्येक बियाण्याची ओळख करू शकत नाहीत किंवा जास्त काळापर्यंत अशा बियाण्यांची साठवणूक करू शकत नाही.त्यासाठी त्यांनी स्वतः वर्धा येथील गांधी आश्रम येथे जाऊन ऑरगॅनिक शेती आणि गेले साठवणूक या बाबतीतली ट्रेनिंग घेतली.
याविषयी त्यांनी बोलताना सांगितले की ही ट्रेनिंग घेतल्याबद्दल त्यांना बऱ्याच गोष्टी समजल्या.तसेच देशी बियाण्यांच्या बाबतीत त्यांचीमाहिती वाढली. नंतर त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन शेतकऱ्यांपासून देशी बियाणे जमा केले.
एक हजार पेक्षा जास्त शेतकरी जोडले गेलेतपूर्ण देशात होते मार्केटिंग
सुदामा साहू यांच्याकडे आत्ता जवळपास एक हजार 100 पेक्षा जास्त देशी बियाण्यांच्या वरायटी आहेत. त्यामध्ये एक हजार पेक्षा जास्त या भाताच्या आणि बाकी वरायटी या कडधान्य व डाळवर्गीय पिकांच्या वरायटी आहेत.त्यांच्याकडे देशातील प्रमुख वरायटी शिवाय श्रीलंका,भूतान,ब्रिटनसोबतच बऱ्याच देशांमध्ये देखील वरायटी आहेत.अशा देशी बियाण्यांची मार्केटिंग देखील करतात.
त्यांनी अनुभव सीड बँक या नावाने एक संस्था स्थापन केली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्यासोबत एक हजार पेक्षा जास्त शेतकरी जोडले गेले आहेत. सोशल मीडिया आणि व्हाट्सअप च्या माध्यमातून जवळजवळ देशातील बरेच ऑर्डर त्यांना मिळतात. मागच्या वर्षी त्यांनी 40 लाख रुपयांची मार्केटिंग केली होती.ते स्वतःही देशी बियाण्याची बचत करतात आणि सोबत दुसऱ्या शेतकऱ्यांनाही त्याबाबतीत प्रशिक्षण देतात.अशा ट्रेनिंग साठी त्यांना दुसरा राज्यांमध्ये देखील बोलावले जाते.त्यांनी ऑरगॅनिक शेती आणि पूर्ण प्रोसिजर तसेच देशी बियाणे जमा करण्याविषयी ची ट्रेनिंगयावर एक पुस्तक देखील लिहिले आहे.
Share your comments