यावर्षी झालेल्या पावसाने इतर शेती पिकांसोबतच कापूस पिकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यामुळे कापूस उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली आहे. त्यासोबतच स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे मागणी वाढल्याने त्या मानाने पुरवठा होत नसून कापसाचे अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे.
देशातील बहुतांशी सूतगिरण्या या रुईच्या अपुऱ्या पुरवठ्याने अडचणीत आले आहेत. जर सुतगिरण यांचा विचार केला तर सूतगिरण्यांना दर दिवशी दीड लाख गाठींची गरज असते परंतु सद्यस्थितीत त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे दक्षिणेकडील सूतगिरण्यांना अधिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
बाजारपेठेमध्ये कापूस आवकेत सातत्याने घट नोंदविण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापूस उत्पादन 350 लाख टन पर्यंत पोहोचेल की नाही याबाबत देखील शंका उपस्थित होत आहे. गेला डिसेंबर महिन्याचा विचार केला तर या महिन्यात पावणे दोन लाख गाठीया सरासरीने आवक बाजारांमध्ये झाली. कमीत कमी तीन लाख गाठींची आवक अपेक्षित होती. परंतु या आवकेमध्ये मध्ये सतत घट येत होती.
परंतु आता कापूस दर चांगले असल्याने शेतकऱ्यांनी देखील कापूस विक्री साठी बाजारात आणत असल्याने बाजारामध्ये 25 हजार गाठींची आवक वाढली असून 2 लाख गाठीवर गेली आहे. सध्याची आवक ही 60000 गाठी प्रति दिवस इतकी आहे. येणाऱ्या काही दिवसात ती 80 हजार गाठ प्रतिदिन होईल अशी अपेक्षा आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे कापसाची स्थानिक खेडा खरेदी आणि शेतकऱ्यांकडून बाजारात विक्री साठी आणलेला कापसाची आवक वाढून ही गाठींची आवक वाढली आहे.
उत्तर भारताचा विचार केला तर तेथील कापसाचा हंगामा सप्टेंबरमध्ये सुरू होऊन डिसेंबर मध्ये संपला.तेथे जास्तीत जास्त कापसाची विक्री शेतकऱ्यांकडून झाली आहे. राजस्थान, हरियाणा आणि पंजाब मिळून प्रतिदिन 25000 गाठीचीआवक होत आहे परंतु तेथेही पुढेही आवक घटूशकते कारण तेथेही कापूस उत्पादनात मोठी घट आल्याचे सांगण्यात येत आहे.
Share your comments