अर्थसंकल्पात शेती हायटेक बनवण्याची घोषणा करण्यात आली. तसे पाहता गेल्या काही वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातली आहे. विविध तंत्रज्ञानाची शेतीला जोड देऊन शेतकरी पीक लागवड ते त्याचे व्यवस्थापनामध्ये प्रयोग करताना दिसत आहेत.
वाढते तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे यातील बरीचशी कामे ही कमी वेळेत, कमी खर्चात करणे शक्य झाले.जर कांदा लागवडीचा विचार केला तर कांदा लागवडीसाठी फार मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते.आधीच मजुरांच्या समस्या असल्याने शेतकरी ऐन लागवडीच्या वेळेस मेटाकुटीला येतात. त्यामुळे कांदा लागवडीचे आता परंपरागत पद्धत बऱ्याचशा प्रमाणात मागे पडत चालली आहे. बरेच शेतकरी आता कांदा पेरणी यंत्राने पेरतात. परंतु याच्याही पुढे जाऊन नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी चक्क मल्चिंग पेपर व कांदा लागवडीचा प्रयोग केला आहे. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा आधार देऊन तालुक्यातील शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाकडे कल वाढला आहे. आजच्या घडीला सुमारे चारशे एकरवर मल्चिंग पेपर व ठिबक द्वारे कांदा लागवड करण्यात आली आहे. निफाड तालुक्याचा विचार केला तर या भागामध्ये द्राक्ष हेदेखील फळ पीक प्रमुख आहे
कांदापिकाची व्यवस्थित नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी निर्यातक्षम कांदा उत्पादनाकडे लक्ष केंद्रित करू लागले आहेत.निफाड तालुक्यात कांद्याच्या क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात वाढ होत आहे.द्राक्ष बागांना हवामान बदलाचा फटका बसल्याने गेल्या काही वर्षापासून द्राक्ष उत्पादनातून हवे तेवढे उत्पन्न हाती लागत नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडून कांद्याची लागवड करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. मागील 1ते2 वर्षांपासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आता कांदा पिकाकडे वळू लागले आहेत. निफाड भागातील शेतकऱ्यांचा विचार केला तर येथील शेतकरी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचे जोड देऊन निर्यातक्षम शेतीमाल उत्पादन करण्यात येथील शेतकऱ्यांचा हातखंडा आहे या भागात जवळजवळ तीन हजार हेक्टर कांद्यापैकी सुमारे चारशे एकरवर मल्चिंग पेपर, ठिबक द्वारे गादीवाफे मध्ये कांद्याची लागवड झाली आहे,. मल्चिंग पेपर व ठिबक च्या अनेक फायद्यामुळे हा ट्रेंड आता वाढू लागला आहे.
मल्चिंग पेपर वर कांदा लागवडीचे फायदे
मल्चिंग पेपर वर कांद्याची लागवड केली तर कांद्याचा आकार हा सारखा होतो. तसेच मल्चिंग पेपर वर सारख्या अंतरावर छिद्रे असल्याने दोन रोपांमधील अंतर देखील एक सारखे असते. त्यामुळे कांद्याची वाढ एकसारखी व चांगल्या पद्धतीने होते. तसेच यामध्ये ठिबकचा वापर केल्याने पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करता येते. मल्चिंग पेपर वर उत्पादित झालेला कांदा हा एक सारखा व रंग चांगला असल्याने बाजारातदेखील चांगला भाव मिळतो. ठिबकचा वापर केल्याने पाण्याची बचत होते तसेच मल्चिंग पेपर मुळे तणांची वाढ जास्त न होता ती नियंत्रणात राहते त्यामुळे खुरपणी व तणनाशक फवारणी चा खर्च देखील वाचतो.
पारंपारिक पद्धतीने कांदा लागवडीच्या माध्यमातून एकरी नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळते परंतु मल्चिंग पेपरचा वापर केल्याने एकरी तीन ते चार टनांची वाढ उत्पादनात होऊ शकते. मल्चिंग पेपर साठी साधारण 10 18 ते 20 हजार रुपये खर्च येतो. हे आणि असे अनेक फायदे मल्चिंग पेपर वर कांदा लागवडीचे आहेत.
Share your comments