पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपये तीन टप्प्यात म्हणजे दोन हजार प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वर्ग केले जातात..
या योजनेसाठी पात्रतेच्या काही अटी आहेत. याची पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.परंतु या योजनेमधून आयकर भरणारे, मोठे शेतकरी, डॉक्टर्स, वकील तसेच सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स अशाच व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येत नाही. परंतु असे अनेक शेतकरी आहेत ते पात्र नसतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे असे सरकारच्या लक्षात आले.त्यामुळेप्रशासनाने नाशिक जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्यावर भर दिला. ज्या शेतकरी पात्र नाहीत अशा शेतकऱ्यांना प्रशासनाकडून नोटिसांची सरबत्ती करतात पैसे परत करण्यास सुरुवात झाली आहे.आतापर्यंत 9783 अपात्र शेतकऱ्यांनी सहा कोटी 99 लाख 34 हजार रुपये परत केले आहेत.
नाशिक जिल्ह्यात 32 हजार 230 शेतकरी पी एम किसान योजना साठी अपात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांपैकी काहीना एक तर त्यांच्या खात्यात अधिक हप्ते जमा झाले आहेत. या आपण त्यांची एकूण रक्कम 17 कोटी 93 लाख 74 हजार आहे. प्रशासनाकडे अपात्र ठरलेल्या 9783 शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम प्रशासनाकडे परत केली असून त्यापोटी तब्बल सहा कोटी 99 लाख 34 हजार इतके पैसे जमा झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील पी एम किसान चा लाभार्थ्यांची स्थिती
नाशिक जिल्ह्यामध्ये पी एम किसान योजना अंतर्गत 493172 शेतकऱ्यांची नोंदणी आहे. त्यापैकी प्रशासनाने दोन हजार 540 प्रकरणे नाकारली असून तांत्रिक कारणास्तव 2 हजार 28 लाभार्थ्यांना लाभ देणे थांबवले आहे. यापैकी जिल्हा प्रशासनाने जवळजवळ 99 टक्के लाभार्थ्यांच्या माहिती दुरुस्त केली आहे.
Share your comments