शासनाने गेल्या 15 ऑगस्ट पासून ई पीक पाहणी अॅप सुरुवात केली.या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतःला आपल्या मोबाईल ॲप द्वारे करता येणारआहे. याला शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
.या मोबाईलच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील जवळ जवळ 38 हजार 761 हजार शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेरा ची माहिती अपलोड केली आहे. अजूनही 44 हजार 772 हजार शेतकरी या पासून दूर आहेत.अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ही पीक नोंद करावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे
15 ऑगस्टला राज्यातील पीक पाणी अँड्रॉइड मोबाईल ॲपचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला होता.या आमच्या द्वारे शेतकऱ्यांनी पिकांची माहिती स्वतः नोंद करूनपीकपाणी नोंदणीत होणाऱ्या चुका टाळाव्यात तसेच प्रशासनिक यंत्रणेवरील ताणही कमी व्हावा यासाठी ई पीक पाहणी मोबाईल ॲप उपक्रम सुरू करण्यात आला आहे.हा उपक्रम महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त सहकार्यानेसुरु करण्यात आला असून जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचा त्यात समावेश आहे. तालुक्यातील 66 हजार 928 शेतकऱ्यांनीया ॲपवर रजिस्ट्रेशन केलेले आहे.त्यापैकी 38 हजार शेतकऱ्यांनी
आपल्या पिकांची माहिती अपलोड केले आहेत दरम्यान 15 ऑगस्टलालोकार्पण झाल्यानंतर जिल्ह्यातील मागील बारा दिवसात 14 हजार शेतकऱ्यांनी या ॲप वर माहिती अपलोड केली आहे.या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना स्वतःच्या पिक पेरा याची माहिती स्वतःचं नोंद करता येणार आहे त्यामुळे चुका कमी होण्यास मदत होणार आहे तसेचई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका तसेच जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणार आहे.
Share your comments