1. बातम्या

Agri News: धक्कादायक! अतिवृष्टीमुळे 'या' जिल्ह्यातील 21 हजार शेतकऱ्यांना फटका,14 कोटींची शासनाकडून मागणी

महाराष्ट्रमध्ये जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये जो काही पाऊस झाला या पावसाने अख्ख्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान केले असून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका दिला आहे. जर या नुकसानीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जिल्ह्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
crop danage in heavy rain

crop danage in heavy rain

महाराष्ट्रमध्ये जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये जो काही पाऊस झाला या पावसाने अख्ख्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान केले असून शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका दिला आहे. जर या नुकसानीचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जिल्ह्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात सारखीच परिस्थिती आहे.

जर यामध्ये आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जुलै आणि ऑगस्ट या कालावधीमध्ये झालेल्या पावसाने एकट्या नाशिक जिल्ह्यात जवळजवळ 21 हजार शेतकऱ्यांचे सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून यामध्ये कोरडवाहू तसेच फळपिके व बागायती पिकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

नक्की वाचा:एकनाथ शिंदेंसाठी टेन्शन वाढले, गटातले आमदार नाराज झाले तरी सरकारचा खेळ खल्लास!

 याबाबतीत आपण शासनाच्या ऑगस्ट महिन्याच्या निर्णयाचा विचार केला तर या शेतकऱ्यांना आता वाढीव निकषानुसार नुकसान भरपाई मिळणार असून त्यासाठी लागणारे सुमारे 14 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण जिल्ह्याला अक्षरशा पावसाने झोडपून काढले व खरिपात पेरलेल्या सगळे पिके वाया गेली.  शिवाय नदी व नाले यांचे पाणी शेतात शिरून काही ठिकाणी पाझर तलाव  देखील फुटले व शेतकऱ्यांचे उभे पीक पाण्यात वाहून गेले. तसेच ऑगस्ट महिन्यात देखील पावसाने हाहाकार माजविला. सोयाबीन, मका व फळभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

नक्की वाचा: सप्टेंबरपर्यंत शेवटची तारीख शेतकऱ्यांनी आधारशी -केवायसी करा; अन्यथा PM किसान चे पुढील हप्ते मिळणार नाहीत.

 संपूर्ण राज्यांमध्ये झालेल्या या पावसाने सगळीकडे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते व त्यासाठी 33 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांना भरपाई देण्यात येणार असल्याने अशा पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. मात्र शासनाने शेतकऱ्यांच्या दबाव व विरोधी पक्षांकडून होणारी टीका लक्षात घेऊन नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला व

त्यासाठी फेर पंचनामे करण्यात आले आहेत. सततच्या या झालेल्या पावसामुळे जी काही नुकसान झाली तिचा एकत्र अंदाज बांधण्यात आला असून या प्रकारचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 21 हजार 595 शेतकऱ्यांच्या दहा हजार 92 हेक्टर क्षेत्रावरील 33 टक्के नुकसान झाले आहे.

नक्की वाचा:LIC Scheme: छोट्या गुंतवणुकीत 22 लाखांपर्यंत परतावा, LIC ची नवी योजना; जाणून घ्या सविस्तर...

English Summary: in nashik district 21 thousand farmer affected due to heavy rain in july and august Published on: 04 September 2022, 09:49 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters