नंदुरबार महाराष्ट्रामध्ये मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध आहे. जवळजवळ गेल्या अडीच महिन्यात येथे मिरचीने दीड लाख क्विंटल चा टप्पा पार केला असून मिरचीच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे.
गुरुवार पासून नंदुरबार येथे मिरचीच्या भावामध्ये सुधारणा होऊन प्रति क्विंटल 500 रुपयांची वाढ झाली आहे.
मिरचीच्या वानांमध्ये जरेल, पापडा तसेच संकेश्वरी, व्ही एन आर या वानांना प्रति क्विंटल 2200 ते 3500 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मिरची हंगाम तेजीत आल्याने शेतकरी आनंदात आहेत. नंदुरबार जिल्ह्यात विविध भागात लागवड केलेला मिरचीची अद्याप कडून सुरू आहे.
नंदुरबार बाजार समितीत काल एकूण 1 लाख 50 हजार क्विंटल मिरचीची आवक झाली होती. जर डिसेंबर महिन्याचा विचार केला तर उत्तर भारतातील बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी नंदुरबार बाजार समिती तूर मिरचीची खरेदी केली होती. या माध्यमातून मिरचीचे व्ही एन आर, शंकेश्वरी,फाफडा इत्यादी वानाच्या मिरचीला 2500 ते 4000 रुपये पर्यंत प्रतिक्विंटल भाव होते.
मागच्या काही महिन्यांमध्ये मिरचीच्या दरांमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. येणाऱ्या काही दिवसांमध्ये मिरची पूर्ण चार हजार रुपयांपर्यंत पोचला अशी आशा व्यक्तकेली जात आहे. गुरुवारी नंदुरबार बाजार समिती 350 वाहनांच्या माध्यमातून शेकडो क्विंटल मिरचीची आवक झाली होती. या मिरचीचे तोलाई उशिरापर्यंत सुरू होती.
Share your comments