सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळत आहे. बैलगाडा शर्यती चे असंख्य शेतकरी शौकीन असतात.
अशा बैलगाडा शर्यती ची आवड असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे काळभैरवनाथ यात्रेच्या उत्सवानिमित्त खासदार डॉ. सूजय विखे पाटील विचार मंच आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून ही बैलगाडा शर्यतीची स्पर्धा शनिवारी 23 व रविवारी 24 एप्रिल 2022 रोजीहोणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे बैलगाडा शर्यत म्हणून याचा उल्लेख केला जात आहे.
नक्की वाचा:आता शेतामध्ये खाकी रंगाचा कापुस पिकणार
या बैलगाडा शर्यतीचे आयोजन खासदार डॉ. सुजय विखे यांचे समर्थक असलेले राळेगन थेरपाळ चे लोकनियुक्त आदर्श सरपंच पंकज कारखिले यांनी आयोजित केली आहे. त्यामुळे बैलगाडा शौकीन यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या बैलगाडा शर्यतीत मिळणारी बक्षिसे
1- प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या बैलगाड्या ला बक्षीस म्हणून दोन लाख रुपये व फळी फोड गाड्यास चांदीचा बैलगाडा देण्यात येणार आहे.
2- दुसऱ्या क्रमांक मिळवणाऱ्या एक लाख रुपये व फळी फोड गाड्यास चांदीचा बैलगाडा देण्यात येणार आहे.
3- तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या पन्नास हजार रुपये बक्षीस व फळी फोड गाड्या चांदीचा बैलगाडा देण्यात येणार आहे.
4- घाटाचा राजा ठरणाऱ्या बैलगाड्यास सोन्याची अंगठी तसेच आकर्षक फायनल साठी पहिल्यात पहिला बुलेट गाडी, पहिल्या दुसरा स्प्लेंडर गाडी अशा पद्धतीने आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बैलगाडा शर्यतीसाठी मोठ्या संख्येने बैलगाडा मालकांनी आपल्या बैलगाड्या समवेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धा कालावधीमध्ये जे बैलगाडा शौकीन उपस्थित राहतील अशा सर्वांची जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली असून उदय विद्यालय प्रांगणात राळेगण थेरपाळ येथे करण्यात आली आहे. संपूर्ण नगर जिल्ह्याचे लक्ष या स्पर्धेकडे लागले असून बैलगाडा शेवटी स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कारण बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठे स्पर्धा ही राळेगण थेरपाळ येथे होत आहे. म्हणून संपूर्ण जिल्ह्याचे आकर्षण ही बैलगाडा शर्यत ठरणार आहे.(स्त्रोत-DNALive24.com)
Share your comments