1. बातम्या

Egg Price: मुंबईत अंड्याच्या किंमतीत कमालीची वाढ, जाणुन घ्या काय आहेत मुंबईत अंड्याच्या किमती

महाराष्ट्रासमवेत भारतात गुलाबी थंडीची चाहूल सुरु झाली आहे. नोव्हेंबर पर्यंत राज्यात विशेषता मुंबईत एवढी थंडी जाणवत नव्हती पण आता मध्य डिसेंबर उजाडला आणि थंडी देखील कमालीची वाढली. थंडी वाढली की, लोक अंड्याला चांगलाच ताव देतात आणि त्यामुळे अंड्याची मागणी हि लक्षणीय वाढते, आणि साहजिकच किमतीत सुद्धा वाढ होते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Egg price

Egg price

महाराष्ट्रासमवेत भारतात गुलाबी थंडीची चाहूल सुरु झाली आहे. नोव्हेंबर पर्यंत राज्यात विशेषता मुंबईत एवढी थंडी जाणवत नव्हती पण आता मध्य डिसेंबर उजाडला आणि थंडी देखील कमालीची वाढली. थंडी वाढली की, लोक अंड्याला चांगलाच ताव देतात आणि त्यामुळे अंड्याची मागणी हि लक्षणीय वाढते, आणि साहजिकच किमतीत सुद्धा वाढ होते.

सध्या मुंबईत होलसेल मार्केट मध्ये 5 रुपयाला अंडे मिळत आहे, तसेच रिटेल मार्केट मध्ये अंडे हे सात रुपयाला मिळत आहे. असे असले तरी मागच्या वर्षापेक्षा अंड्याच्या किंमती ह्या थोड्या कमीच आहेत असे सांगितलं जात आहे की मागच्या वर्षापेक्षा इक रुपयाने अजूनही अंडे स्वस्त मिळत आहे. अंड्याच्या भाववाढीचे कारण वाढत्या थंडीला सांगितलं जात आहे.

 

यावर्षाच्या नोव्हेंबरमध्ये अंड्याच्या विक्रीत मोठी घट झाली होती. विक्रीत दररोज 35 लाख अंड्यांची घट झाल्याचे सांगितले जात होते. पण आता डिसेंबर महिना लागला आहे आणि परिस्थिती हि पूर्णतः बदलली आहे. आता ह्या महिन्यात दैनंदिन मागणीत 40 लाख अंड्यांची वाढ झाली आहे. मुंबई एग्ज असोसिएशनचे अध्यक्ष आफताफ खान यांनी सांगितले की, सध्या दररोज 78 लाख अंडी विकली जात आहेत. तसेच आता मागणी हि स्थिरावताना दिसत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत अंड्याचे दर देखील ह्याच रेटवर स्थिरवतील असे सांगितले जात आहे.

मुंबईत परराज्यातून अंडे दाखल मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी आहे, म्हणुन मुंबई मध्ये लागू असलेले अंड्याचे दर दुसऱ्या ठिकाणी प्रभाव टाकतात. मुंबईमध्ये हैदराबाद, कर्नाटक आणि राज्याच्या विविध जिल्ह्यातून अंडी येतात. अंडीच्या उत्पादनात झपाट्याने वाढ झाल्याने यावर्षी नोव्हेंबरमध्ये दर कमी झाले होते. मात्र आता डिसेंबरमध्ये अंड्याची मागणी वाढली म्हणुन अंड्याचे दर देखील वाढताना दिसत आहेत. अंडा व्यापाऱ्यांच्या मते मागणी पूर्ण करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून अंडी आणली जात आहेत. राज्यात देखील पुणे, सांगली आणि इतर जिल्ह्यांमध्ये अंड्याचे चांगले उत्पादन आहे

English Summary: in mumbai egg price is increasing tremendously Published on: 16 December 2021, 09:00 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters