शेतकरी अहोरात्र आपल्या काळ्या आईची सेवा करतो आणि सोन्यासारखा शेतमाल पिकवतो, मात्र याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. मात्र गिऱ्हाईक आणि शेतकरी यांच्यामध्ये असलेली एक कडी म्हणजे आडते अथवा दलाल शेतकऱ्यांपेक्षा कितीतरी अधिक पटीने कमवितात. याचेच एक उदाहरण समोर आले आहे ते नागपूरमधील गोकुळपेठ भाजीबाजारात.
त्याच झालं असं शेतकऱ्याकडून पाच रुपये किलोने विकत घेतलेला पालक हा तब्बल 60 रुपये किलोने गिऱ्हाईकाला विकला गेला. त्यामुळे घाम गाळून सोन्यासारखं पीक उगवणाऱ्या बळीराजाची आणि काम करून कसाबसा आपला उदरनिर्वाह भगवणाऱ्या गिऱ्हाईकाची केवढी फसवणूक होते याचे जीवित उदाहरण समोर आले आहे.
फक्त दोनच तासात किलोमागे 55 रुपयाची दलाली
शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड करतात, भाजीपाला लवकर खराब होतो म्हणुन शेतकरी त्याला लवकर विक्री करायला बघतो. व्यापारी वर्गाला हे ठाऊक असते म्हणुन भाजीपालाची आवक हि जास्त असल्याचे भासवून शेतकऱ्याकडून व्यापारी कवडीमोल भावात भाजीपाला विकत घेतो.
व्यापारी आणि किरकोळ विक्रेता यांच्यात आपसात संगणमत असते, म्हणुन कवडीमोल किंमतीत घेतलेला भाजीपाला किरकोळ बाजारात चढ्या भावाने विकला जातो. असेच घडले नागपूरच्या गोकुळपेठ भाजीबाजारात 5 रुपये किलोने शेतकऱ्याकडून खरेदी केला जाणारा पालक हा ह्या बाजारापेठेत तब्बल 60 रुपये किलोने विकला जातोय. म्हणजे अवघ्या दीड दोन तासात किलोमागे 55 रुपये दलाली, दलाल कमवीत आहे हे चित्र भाजीबाजारात दिसून आले. ह्या मनमान्या कारभारावर कोणाचेच अंकुश बघायला मिळत नाही. यामुळे सर्वात जास्त पिळवणूक शेतकऱ्यांची होते हे मात्र नक्की.
शेतकरी राजाला लागवडीसाठी आलेला खर्च काढणे देखील आहे मुश्किल
व्यापारी वर्ग शेतकऱ्याला भाजीपालाची जास्त आवक असल्याचे भासवतो आणि कमी भावात भाजीपाला विकत घेतो, दुसरीकडे किरकोळ विक्रेता मध्यंतरी झालेल्या पावसामुळे भाजीपाला बाजारात येत नाही म्हणुन कृत्रिम टंचाई निर्माण करतो आणि गिऱ्हाईकाला चढ्या दराने भाजीपाला विकतो. म्हणजे व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांची साठगांठ यावरून स्पष्ट समजते. व्यापारी वर्गाला यामुळे फायदा मिळतो तर दुसरीकडे शेतकऱ्याला लागवडीसाठी आलेला खर्च देखील काढणे मुश्किलीचे होते. एकंदरीत ह्या बाजारपेठेतील चित्र शेतकरी आणि गिर्हाईक याची होणारी पिळवणूक दाखवण्यासाठी पुरेशी आहे. यावर वेळीच अंकुश घालणे अपरिहार्य आहे नाहीतर शेतकरी कर्जबाजारी होईल एवढे नक्की.
Share your comments