राज्यात खान्देश आणि मराठवाड्यात कपाशी लागवड मोठ्या प्रमाणात दिसून येते, पण यावर्षी खांदेश समवेत मराठवाड्यात कपाशी लागवड हि तुलनेने कमी झाली होती, त्यामुळे साहजिकच कापुस उत्पादन हे लक्षणीय कमी झाले आणि बाजारात मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाली त्यामुळे कापसाला चांगले विक्रमी दर मिळाले.
खरीप हंगामात कपाशीला उच्चाँकी दर मिळाला म्हणुन आता अनेक शेतकरी रब्बी हंगामात कपाशी लागवड करण्याच्या विचार करत आहेत, तर काहींनी रब्बी हंगामात कपाशी लागवड केली सुद्धा. काही जण खरीप हंगामातील कपाशीचे फरदडीचे उत्पादन घेतात, मात्र शेतकऱ्यांचा हा प्रयोग किती यशस्वी होतो हे बघावे लागेल, कारण की फरदड घेतलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड आळी मोठ्या प्रमाणात हल्ला चढवते म्हणुन कृषी वैज्ञानिक कपाशीची फरदड टाळण्याचा सल्ला देतात. मात्र शेतकऱ्यांनी चक्क रब्बी हंगामात कपाशी लागवड करण्याचा निर्णय घेतला पण यामुळे किडिंचा प्रकोप वाढेल शिवाय जमीनही नापीक होईल अशी आशंका शेती क्षेत्रातील जाणकार लोक व्यक्त करत आहेत.
कपाशीचे क्षेत्र का घटले
कपाशी तसे बघायला गेले तर खरीप हंगामातील पीक आहे, याची लागवड खरीप हंगामात खांदेश, मराठवाडा, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात केली जाते. मात्र, यावर्षी खरीप हंगामात मराठवाड्यात तसेच खान्देश आणि राज्यातील इतर प्रांतात कपाशी लागवडीत कमालीची घट घडून आली. याचे प्रमुख कारण म्हणजे खरीप हंगामात लागवड केलेल्या कपाशीत रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच होता आणि परिणामी कापसाच्या उत्पादनात घट घडतं होती आणि शेतकऱ्यांना त्यामुळे कपाशी लागवड हि शेतकऱ्यांना परवडत नव्हती म्हणुन राज्यातील विशेषता खांदेश आणि मराठवाड्यातील कापसाचे क्षेत्र घटले असावे असा अंदाज बांधला जातोय.
या तालुक्यात चक्क रब्बीत कपाशी
कपाशी हे रब्बी हंगामातील पीक नाही आणि याची लागवड करण्याची शिफारस कृषी वैज्ञानिक देखील करत नाहीत पण मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील फुलांग्री तालुक्यात रब्बी हंगामात कपाशी लागवड बघायला मिळाली. तालुक्यातील निमखेडा या गावातील एका कापुस उत्पादक शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात कपाशी लागवड केली,
मात्र या शेतकऱ्यांचा हा प्रयोग फसतांना दिसतोय, कारण की भुईतून कपाशी बाहेर पडताच त्यावर कोकड्याचा हल्ला झाला. शेतकरी मित्रांनो 15 जुलै नंतर जर कपाशी लावली तरीसुद्धा उत्पादनात घट घडते मग रब्बीत कपाशी लागवडीतून यशस्वीरीत्या उत्पादन घेणे हे थोडे कठीणच आहे, तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या ह्या प्रयोगाला किती यश मिळते हे बघण्यासारखे असेल.
संदर्भ टीव्ही9
Share your comments