गेल्या वर्षी शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा खूप मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट नमूद करण्यात आली होती, शेतकऱ्यांनी मागील वर्षाचे दुःख विसरून पुन्हा एकदा नवीन जोमाने या नवीन वर्षात रब्बी हंगामातील पिकांच्या जोपासण्यासाठी सामर्थ्य दाखवले. पण शेतकऱ्यांच्या या उभारीला पुन्हा एकदा मागे खेचण्याचे काम निसर्ग करताना दिसत आहे. मराठवाड्यातील औरंगाबादसह विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यात (In almost all the districts of the division including Aurangabad in Marathwada) वावरात उभे असलेल्या तुर पिकाला बदललेल्या ढगाळ हवामानाचा तसेच अवकाळी व गारपिटीचा मोठा फटका बसलेला दिसत आहे.
तुर पिकात मराठवाड्यात सर्वत्र आधीच ढगाळ वातावरणामुळे मररोग, शेंगा पोखरणारी अळी आणि पाला फुलांची जाळी करणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यासंदर्भात कृषी विभागाने पाहणी देखील घडवून आणली होती या पाहणीत देखील या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेले नमूद करण्यात आले आहे. असं असतानाच दुष्काळात तेरावा महिना म्हणून मंगळवारी काढणीला आलेली तुर शेतकरी बांधव घरीच आणणार होते नेमक्या त्याचवेळी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात गारपीट (HailStorm) झाल्याने तूर पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले. कृषी क्षेत्रातील जाणकार लोक सांगत आहेत की यामुळे परिसरातील तूर उत्पादनात जवळपास 30 टक्क्यांपर्यंत घट घडून येणार आहे.
तुर खरेदी करणारे व्यापारी, तूर उत्पादक शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी यांनी देखील तुर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घडून येईल असे वक्तव्य केले आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तुर पिकाखालील सरासरी लागवडीचे क्षेत्र जवळपास पावणे 13 लाख हेक्टर एवढे विक्रमी आहे. मात्र यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नवा विक्रम प्रस्थापित करत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर तूर लागवड केली आहे, यंदा राज्यात जवळपास साडेतेरा लाख हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष तुरीची लागवड बघायला मिळत आहे. यातून जवळपास 11 लाख टन तुरीचे उत्पादन मिळण्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. एकट्या मराठवाड्यात जवळपास पाच लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड, बीड या सहा जिल्ह्यात (In six districts of Marathwada namely Aurangabad, Osmanabad, Parbhani, Latur, Nanded, Beed) सुमारे दीड लाख हेक्टरवर तूर लागवड केली गेली आहे.
या एवढ्या मोठ्या क्षेत्रावर मररोग, शेंगा पोखरणारी अळी याचे मोठ्या प्रमाणात सावट नजरे पडत आहे. या एकंदरीत बदललेल्या परिस्थितीमुळे उत्पादनात कमालीची घट होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बाजारपेठेचे एक सूत्र असते जर उत्पादन कमी असले तर बाजार भाव हा विक्रमी मिळत असतो मात्र यंदा तुर पिका बाबत यापेक्षा उलट घडताना दिसत आहे उत्पादन कमी असताना देखील तुर पिकाला पाहिजे तेवढा बाजार भाव प्राप्त होताना दिसत नाहीये. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी कमालीच्या अडचणीत सापडलेला आहे. सध्या तुरीला सहा हजार प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. आता राज्यातील विशेषता मराठवाड्यातील तूर उत्पादक शेतकरी कवडीमोल दर आणि उत्पादनात झालेली घट यामुळे दोन्ही बाजूनी पिसला जात आहे एवढे नक्की.
Share your comments