राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. यामध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा व्यापक विस्ताराची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण, मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर, या योजनेवर १००० कोटी रुपये खर्च करणार.
शेतकऱ्याची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर योजना. याशिवाय मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ वाढविणार. प्रलंबित ८६,०७३ कृषिपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी. उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च २०२४ पर्यंत असणार आहे.
राज्यातील बाजार समितींत शेतकऱ्यांना मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन आणि जेवणासाठी शिवभोजन थाळी. महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार, १० हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करणार, नगर येथे मुख्यालय. याशिवाय राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी.
शिंदे सरकारची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ, जन्मानंतर मुलीला ५००० रुपये, पहिलीत ४००० रुपये, सहावीत ६००० रुपये, अकरावीत ८००० रुपये, मुलगी १८ वर्षांची झाल्यावर ७५,००० रुपये मिळणार. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या तिकिटदरात महिलांना ५० टक्के सवलत.
महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेत नवीन २०० रुग्णालयांचा समावेश, मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ ४ लाखांपर्यंत, राज्यभरात ७०० स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना.
शेतकऱ्यांनो गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिक काढणीला आली असतील तर घाई करा, पुन्हा पावसाची शक्यता
तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ, विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार, इयत्ता ५ ते ७ वी : १००० वरून ५००० रुपये, तर ८ ते १० वी : १५०० वरून ७५०० रुपये करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
शेततळे योजनेचा विस्तार, जलयुक्त शिवारला संजीवनी, अर्थसंकल्प जाणून घ्या
शेततळे योजनेचा विस्तार, जलयुक्त शिवारला संजीवनी, अर्थसंकल्प जाणून घ्या
'अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा'
Share your comments