स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी यासाठी संपूर्ण देशात 75 डिजिटल बँका सुरू होत असून यामध्ये राज्यातील नागपूर,मुंबई,औरंगाबाद आणि सातारा या जिल्ह्यातील प्रत्येकी एक अशा चार बँक यामध्ये सुरू होणार आहेत. औरंगाबादमध्ये देखील ही बँक होणार असून ही बँक गजानन महाराज मंदिर परिसरात असणार असून यासाठी जागाही निश्चित केल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सोमवारी बोलताना सांगितले.
राज्यस्तरीय बँकर्स कमिटीची बैठक सोमवारी पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये झाली. या बैठकीनंतर भागवत कराड यांनी झालेल्या निर्णयाची माहिती दिली. बारा सार्वजनिक बँका, खासगी बँकांचे एमडी प्रत्यक्षात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीला हजर होते.
नक्की वाचा:दिल्लीचा ऐतिहासिक राजपथ आता होणार 'कर्तव्यपथ', मोदी सरकार नाव बदलणार..
डिजिटल बँक म्हणजे नेमके काय?
डिजिटल बँकेच्या शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडून विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल. ग्राहकांना या स्वयं सेवाअंतर्गत किफायतशीर,
कागदपत्र विरहीत व सुरक्षित वातावरणात बँकांची उत्पादने आणि सेवांच्या डिजिटल पद्धतीने लाभ घेता येईल. तसेच व्यवसाय आणि सेवांच्या माध्यमातून जर ग्राहकांच्या तक्रारी उद्भवलेल्या तर त्यांचे निराकरण करण्यासाठी पुरेशी डिजिटल यंत्रणा असेल.
तसेच या डिजिटल बँकांच्या माध्यमातून ठेवी स्वीकारणे आणि कर्ज सेवा पुरविल्या जातील. बँकांच्या डिजिटल बँकेत कक्षांना बँकिंग आउटलेट म्हणजे शाखा असे मानले जाईल.
काही महत्वाचे
राज्यामध्ये बँक व्यवहार नसणारी तीन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येची 33 गावे असून या गावात डिसेंबरच्या अखेरपर्यंत बँक शाखा सुरू करण्याचा निर्णय बँकर्स समितीच्या बैठकीत झाला असून राज्यातील 1628 गावांमध्ये बँक नसल्याने तेथे बँक प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत.
नक्की वाचा:कौतुकास्पद! कामाच्या थोड्याशा बदलाने घडवून आणला सकारात्मक परिणाम, वाचा माहिती
Share your comments