महाराष्ट्र मध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडी अतिशय वाढली आहे.येणाऱ्या चोवीस तासांमध्ये तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे हवेत गारवा निर्माण होऊन थंडीची लाट येण्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पश्चिमी चक्रावात त्यामुळे राज्यात थंडीचा गारठा वाढला असून सलग तिसऱ्या दिवशी थंडी कायम आहे.
जर महाराष्ट्राचा विचार केला तर गेल्या चोवीस तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार जळगाव, पुणे, अहमदनगर तसेच नाशिक आणि मराठवाड्यातील जालना,औरंगाबाद,परभणी आणि बीड याठिकाणी गेल्या चोवीस तासात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे वयेथेथंडीची लाट कायम होती.
वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात आणखी तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये देखील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून पुढील चोवीस तासात कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
तसेच मुंबई परिसरात देखील तापमानात कमालीची घट झालेली पाहायला मिळत आहे.विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस जाणार आहे.दिवसभर वातावरणात गारवा राहू शकतो असा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Share your comments