भारतात बहुतांश शेतकरी पारंपरिक पिक पद्धतीने शेती करतात आणि त्यामुळे त्यांना पाहिजे तेवढा मोबदला शेतीमधून मिळत नाही. पारंपरिक पिकांची लागवड हि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ घडवून आणण्यास असमर्थ आहे. परंपरागत पद्धतीने शेती करायला शेतकऱ्यांना अधिक मेहनत करावी लागते पण शेतकऱ्यांना हवे तेवढे उत्पन्न त्यातून मिळत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना नकदी पिकांच्या लागवडीचा सल्ला दिला जातो तसेच शासन देखील आता यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. शेती हि आधुनिक पद्धतीने करणे हि काळाची गरज बनली आहे, ह्यातूनच शेतकरी बांधवांचे कल्याण होऊ शकते. म्हणुनच सध्या महाराष्ट्र सरकार रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी व शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र रेशीम मंडळाने एक जागरूकता अभियानाची सुरवात केली आहे. ह्या अभियानाची सुरवात 25 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. ह्या अभियानातून शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाविषयीं माहिती दिली जाणार आहे. रेशीम पासुन कुठले उत्पाद हे तयार होतात याविषयीं सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच मनरेगा आणि पोखरा योजनेंतर्गत तुती रेशीम उद्योगात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी देखील या अभियानांतर्गत केली जाईल.
शेतकरी ज्या पारंपरिक पद्धतीने शेती करतात तिथे त्यांना अनेकदा तोटा सहन करावा लागतो. म्हनुन रेशीमच्या शेतीला शासन प्रोत्साहन देत आहे. असे सांगितले जात आहे की, रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हे दुपटीने वाढेल आणि कृषी विभाग देखील असा अंदाज वर्तवीत आहे. तसे पाहता महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांत रेशीम लागवडीचे क्षेत्र हे लक्षणीय वाढत आहे. मात्र, तरीदेखील रेशीम शेतीत व उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.
अभियानाचे उद्दिष्टे
शेतकरी मित्रांनो ह्या अभियानाद्वारे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रेशीम लागवड वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
महाराष्ट्र रेशीम विकास मंडळ गावागावात जाणार आहे आणि शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे महत्त्व हे पटवून दिले जाणार आहे. मंडळ हे एका रेशीम रथातून गावागावात भेट देणार आहे. ह्या अभियानाद्वारे रेशीम किड्याचा खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अधिकाधिक तुतीची लागवड करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या अभियानामध्ये इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी देखील मंडळद्वारे करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आधीच रेशीम शेती करत आहेत व यातून चांगले उत्पादन घेत आहेत त्या ठिकाणी जाऊन देखील त्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन हे केले जाईल.
Share your comments