यावर्षी सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणाचे शिकार झालेत, शिवाय या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या लहरीपणाचा देखील सामना करावा लागला आहे. बाजारभावात नेहमी चढ उतार असल्याने सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी सावध पावित्रा अंगीकारला आणि शेतमालाचे भंडारण करण्यावर अधिक भर दिला. आता सध्या कापसाची विक्री चालू आहे आणि कापसाला चांगला रेट देखील मिळत आहे.
सध्या कापसाला 8500 रुपये क्विंटलच्या दराने बाजारभाव मिळत आहे. काही दिवसापूर्वी यापेक्षा चांगला बाजारभाव कापसाला मिळत होता, जवळपास 9 हजार रुपये क्विंटलच्या दराने बाजारभाव मिळत होता. कापुस उत्पादक शेतकरी यांच्या मते, सध्या जो बाजारभाव मिळत आहे तो यावर्षीचा सर्वात जास्त भाव आहे. असे असले तरी यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात कमालीची घट घडून आली आहे, त्यामुळे कापुस उत्पादक शेतकरी थोडी ख़ुशी थोडा गम या परिस्थितीत बघायला मिळत आहेत.
राज्यात कपाशी आणि सोयाबीन हे दोन्ही खरीप हंगामातील मुख्य पिके आहेत, तसेच या दोन्ही नगदी पिकांवर बहुतांश शेतकरी अवलंबून आहेत. असे असले तरी या दोन पिकांच्या उत्पादनात यंदा थोडी घट बघायला मिळत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीला म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात राज्यात अवकाळीने हजेरी लावली होती, आणि नेमके तेव्हा हे दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत होती, आणि तेव्हा अतिवृष्टीने एवढा हाहाकार माजवला होता की दहा ते पंधरा दिवस पावसाने उघडीप दिली नव्हती आणि त्यामुळे अक्षरशः वावरात पाणी तुंबले होते आणि त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे.
जर आपण कापसाचा विचार केला तर प्रति एकर फक्त तीन क्विंटल पर्यंत कापुस शेतकऱ्यांना मिळत आहे म्हणजे प्रति एकर पाच ते सहा क्विंटल कापसाच्या उत्पादनात घट घडून आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात मोठा फटका सहन करावा लागला आहे असे असले तरी रेट चांगले आहेत म्हणुन शेतकऱ्यांना मिळते जुळते परिणाम भेटत आहेत. मागच्या वर्षी फक्त सहा हजार पर्यंत कापसाला भाव मिळत होता आणि आज भाव हा 9000 रुपये क्विंटल पर्यंत जाऊन ठेपला आहे. असे असले तरी उत्पादनात घट घडली असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा न तोटा अशी परिस्थिती आहे.
Share your comments