अतिवृष्टी, अवकाळी पाऊस इत्यादी संकटांच्या मालिकांनी शेतकरी प्रचंड प्रमाणात समस्येत असताना त्यासोबतच अशा हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून व्यवस्थापनासाठी आधीच प्रचंड खर्च होत असताना माढा तालुक्यातील बावी परिसरातएक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
येथील काही शेतकऱ्यांनीद्राक्ष बागांवर उत्पादन वाढीसाठी ग्रीन गोल्ड या रासायनिक खताचा वापर केला होता.परंतु या रासायनिक खताच्या फवारणी केल्यानंतरद्राक्ष जळुलागले आहेत. त्यामुळे या परिसरात जवळजवळ चारशे ते पाचशे टनांपेक्षा जास्त द्राक्षांचे नुकसान झाले असून जवळजवळ दोन कोटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या या परिसरातील द्राक्ष हे तोडणीला असताना द्राक्ष फुगण्याच्या दृष्टिकोनातून येथील काही शेतकऱ्यांनी मोडनिंब कृषी केंद्रातून ग्रीन गोल्ड कंपनीची विविध प्रकारचे रासायनिक अन्नद्रव्य खरेदी करून ते द्राक्ष बागेसाठी वापरली होती. परंतु या खतांची फवारणी केल्यानंतर द्राक्षजळू लागण्याची बाबशेतकऱ्यांच्या लक्षात आली..
त्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली आहे. या कृषी सेवा केंद्रातील खतांचे नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी दिले होते.या तपासण्या अहवाल मध्ये निष्पन्न झाले की खतामध्ये 70 अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याची बाब समोर आली आहे.बावी परिसरातील जवळजवळ वीस शेतकऱ्यांनी मोडनिंब येथील या कृषी केंद्रातून रासायनिक खतांची खरेदी केली होती. उत्पादन वाढीसाठी हा डोस द्राक्षांना दिला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
परंतु उत्पादन वाढ तर दूरच राहिले परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडलेली आहे. यामध्ये विजय मोरे नावाच्या शेतकऱ्यांचे दीड एकर मधील द्राक्षांचे नुकसान झाले असून त्यांच्या दीड एकरामध्ये जवळजवळ बारा लाखाचे नुकसान झाले आहे.
Share your comments