MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

कांदा आयातीचा परिणाम! लासलगाव मार्केट मध्ये लाल कांद्याची 700 तर उन्हाळी कांद्याची 500 रुपयाने घसरण

केंद्र सरकारच्या परवानगीनंतर व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तान, तुर्की आणि इराण सह इतर देशातील कांदा आयात करताच लासलगाव बाजार समितीत एका दिवसात लाल कांद्याच्या दरामध्ये सातशे रुपयांची घसरण झाली तसेच उन्हाळी कांद्याच्या दरात हीपाचशे रुपयाची घसरण पाहायला मिळाली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion rate

onion rate

केंद्र सरकारच्या परवानगीनंतर व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तान,  तुर्की आणि इराण सह इतर देशातील कांदा आयात करताचलासलगाव बाजार समितीत एका दिवसात लाल कांद्याच्या दरामध्ये सातशे रुपयांची घसरण झाली तसेच उन्हाळी कांद्याच्या दरात हीपाचशे रुपयाची घसरण पाहायला मिळाली.

दर सरासरी घसरणीचा विचार केला तर लाल कांद्याच्यादरामध्ये 800 तर उन्हाळी कांद्याच्या दरामध्ये साडेतीनशे रुपयाची घसरण झाली.

 यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा हवेतील आद्र्रता आणि ओलाव्यामुळे प्रचंड प्रमाणात खराब झाला.तसेच टाकलेल्या रोपवाटिका देखील पावसाने खराब केल्या.त्यामुळेशेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला होता. परंतु या वर्षी झालेल्या अति पावसामुळे प्रतवारीत घट झाली. तसेच साठवलेल्या कांद्याच्या वजनात ही घट झाल्याने शेतकऱ्यांनामिळणाऱ्या चांगला भाव आतून कुठेतरी खर्च निघून दोन पैसे हातात मिळणार होते.

परंतु शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आली.कारणसरकारला कांद्याचे वाढते दर पाच राज्यांच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी डोकेदुखी ठरू शकतात त्यामुळे सरकारने आयकर धाडी, बफर स्टॉक ची एक लाख मेट्रिक टन हून अधिक कांद्याची बाजारपेठेत विक्री  तसेच कांदा आयातीला परवानगी देऊन कांद्याचे दर स्थिर करण्याचा सरकारचा प्रयत्न केला.सगळ्या निर्णयाचा शेतकरी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे.याबाबतीत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवूनकेंद्राला कांद्याचे भाव पाडण्यात यश आले.

प्रचंड मेहनत,महागडी बियाणे,कीटकनाशकेइत्यादींचा वापर करू शकल्याने कांदा पिकाला होता मात्र दोन दिवसात जवळपास 600 रुपयांनी कांद्याच्या दरात घट झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.उन्हाळी कांद्याला  किमान एक हजार तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे बारा रुपये तर सरासरी 2300 रुपये भाव मिळत आहे.  लाल कांद्याला किमान एक हजार 700 तर कमाल 2201 रुपये भाव मिळत आहे. तर सरासरी 1700 रुपये भाव मिळत आहे.

English Summary: in lasalgaon market red onion rate decrease by 700 and rubby onion decrease by 500 Published on: 14 November 2021, 07:12 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters