राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सरकारने शेतकर्यांना कर्ज मुक्त करण्यासाठी महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर केली.या योजनेच्या अंतर्गत तीन टप्प्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार होते.
त्यामधील पहिल्या टप्प्यात दोन लाख पर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होणार होते तर दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखांवरील रक्कम भरल्यानंतर त्यांच्या खात्यावर दोन लाख रुपये वर्ग करण्यात येणार होते. आणि या योजनेतील तिसरा टप्पा होता तो म्हणजे जेशेतकरी प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. यातील पहिल्या दोन टप्प्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला.
या कर्जमाफी पोटी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 283 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. यामध्ये दोन लाख व त्यावरील कर्जमाफीचा आदेश आला परंतु प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा अध्यादेश आलेला नाही. सरकारने घोषणा केली परंतु कोरोना मुळे सरकारकडे पैसे नसल्याचे कारण देत ही रक्कम दिलेली नाही. जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणारे सुमारे दोन लाख पंचवीस हजार शेतकरी आहेत.
या शेतकऱ्यांसाठी जवळजवळ पाचशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे. ही रक्कम आज किंवा उद्या मिळेल या एकच अपेक्षा वर सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा मात्र मोठ्या प्रमाणात भ्रमनिरास झाला आहे आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर कर्ज परतफेड करण्यात राज्यात हा जिल्हा आघाडीवर आहे.परंतु याचजिल्ह्यातील प्रामाणिक शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला जात आहे.
Share your comments