खानदेशात भरड धान्य खरेदी गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे परंतु केली जाणारी हीअत्यंत कमी प्रमाणात सुरू आहे. त्यामध्ये ज्वारी, बाजरी आणि मक्याची अल्प प्रमाणात खरेदी केली गेली असेल दर्जा उत्तम असल्याने अनेक शेतकऱ्यांना ज्वारी परत घरी न्यावी लागली आहे
हमीभावाच्या अपेक्षेने बऱ्याच शेतकऱ्यांनीधाण्याची साठवणूक करून ठेवली होती. परंतु ऐनवेळी दर्जा आणि इतर मुद्दे उपस्थित केले जात असल्याने समस्या निर्माण झाली आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 19 खरेदी केंद्र सुरू झाले आहेतधुळे आणि नंदुरबार जिल्हे दहा खरेदी केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत पाच हजार क्विंटल ज्वारी ची खरेदी संपूर्ण खान्देशमिळूनकरण्यात आली आहे.त्या तुलनेत मका आणि बाजरीची खरेदी अत्यल्प आहे.
ज्वारी विक्रीची नोंदणी चार हजार शेतकऱ्यांनी केली होती तर मका बाजरी साठी सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.केंद्र सुरू होण्यापूर्वीच काही नोंदणी धारक शेतकऱ्यांनी आपली मक्का,ज्वारी आणि बाजरीची विक्री केली आहे.ज्वारी आणि बाजरीची विक्री डिसेंबर मध्यानंतर खानदेश मध्ये सुरु करण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यातच खरेदी सुरू झाल्यानंतर ज्वारी उत्पादकांना दर्जाचे कारण पुढे करून आपली ज्वारी परत न्यावी लागत आहे.
यामुळे अनेक खरेदी केंद्रांवर वाद देखील उद्भवले. परंतु प्रशासन याबाबत कुठल्याही प्रकारची कारणे ऐकायला तयार नाही.काही शेतकऱ्यांनी मध्यंतरी तक्रार दाखल करून देखील प्रशासन याबाबत कुठलीही दखल घेत नसल्याची स्थिती आहे.(संदर्भ-ॲग्रोवन)
Share your comments