हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या एका रात्रीतून शेत शिवारचे चित्रच बदलत आहे. काढणीच्या प्रसंगीच शेतामध्ये पाणी साचल्याने कांदा नासण्याची भीती व्यक्त होत आहे. मोठ्या प्रमाणावर कांदा यामध्ये भिजला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना आला आहे.
यामुळे शेतकऱ्याच्या मागे लागलेली आर्थिक संकटे संपताना दिसत नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अशीच परिस्थिती आली होती, तेव्हा देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर नैसर्गिक संकट हे पाचवीलाच पुजल्यासारखे झाले आहे. यापुर्वी द्राक्ष बागांचे नुकसान झाले आता रब्बी पिकांची तीच अवस्था झालेली आहे. कितीही नियोजन केले तरी निसर्ग तोंडचा घास हिसकावतच आहे. यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
यामुळे रब्बी हंगामातही निसर्गाचा लहरीपणा कायम आहे. अंतिम टप्प्यात पिके असताना झालेल्या पावसामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. यामध्ये कांदा, द्राक्ष बागांबरोबरच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. ज्वारी काळवंडणार तर गव्हाच्या लोंब्या जमिनदोस्त झाल्या आहेत. काढणी करताना अनेकांच्या पदरी निराशा पडली आहे. यामुळे केवळ पैसे घेण्याचे बाकी असताना मोठे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. यामुळे आता शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
येथील लासलगाव परिसरात द्राक्ष बागा ह्या जमिनदोस्त झाल्या आहेत तर द्राक्ष हे चिखलात माखलेले आहे. त्यामुळे या बागांवर लाखो रुपये खर्च केलेले असताना आता याचा ताळमेळ कसा बसवायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. अवकाळी, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षाच्या उत्पादनात घट झाली शिवाय जे पदरी पडले त्याचा दर्जा नसल्याने अपेक्षित दर मिळाला नाही. आता रब्बी हंगामातील पिके बहरात होती तर अवकाळीच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे. यामुळे पुन्हा उभा राहणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे.
Share your comments